Pune Warje Malwadi Crime news : पुण्यात पालघर सारखी एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वारजे माळवाडी येथील एका नामांकित शाळेत ११ वर्षांच्या मुलावर शाळेतील नृत्य प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनामुळे ही घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे पालक संतत्प झाले आहे. शाळा प्रशासनाला जाब विचारत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार रात्री आरोपी नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज शाळा बंद ठेवण्याचे आवाहन पालकांनी केला असून आंदोलन देखील केले जाणार आहे.
पुण्यात महिलांवरील अत्याचार वाढत असतांना आता शाळेत देखील लहान मुले सुरक्षित नसल्याचं उघडं झालं आहे. वारजे माळवाडी भागात असलेल्या या शाळेत नृत्य प्रशिक्षकाने ११ वर्षांच्या मुलाला नृत्य शिकवतांना त्याच्यासोबत अश्लील कृत्य केले. ही घटना मंगळवारी घडली. शाळेत समुपदेश सुरू असतांना पीडित मुलाने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. या नंतर संतप्त पालकांनी या प्रकरणी शाळा गाठत शाळेच्या प्रशासनाला धारेवर धरले. तसेच संबंधित नृत्य प्रशिक्षकाला शाळेतून काढून टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुरवातीला या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, पालकांच्या दबावापुढे शाळा प्रशासनाने कारवाई करत या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नृत्य प्रशिक्षकाला अटक देखील करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. काल रात्री पालकांनी सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी केली. आज या घटनेप्रकरणी पालकांनी शाळा बंद आंदोलन करणार आहे. या बाबत पालकांना सोशल मिडियावरून आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या