मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain: तुडुंब भरलेल्या धरणांतून पाणी सोडले; पुणे जिल्ह्याच्या काही भागांत पुराची शक्यता

Pune Rain: तुडुंब भरलेल्या धरणांतून पाणी सोडले; पुणे जिल्ह्याच्या काही भागांत पुराची शक्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 16, 2022 03:12 PM IST

Pune rain update : पुणे जिल्ह्यात काल रात्री पासून पवसाची संतत धार सुरू आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून नदी काठच्या गावांना धोक्याचा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला धरण
खडकवासला धरण

पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात वाढ होत आहे. यामुळे खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये तब्बल ३० ते ३५ हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी अशी माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे साह्याक अभियंता यो.स.भंडलकर यांनी शुक्रवारी दिली आहे. दरम्यान हा विसर्ग पाहता पुण्यातील भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १५,२११ क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी १२ नंतर वाजता ३५ हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. यात आवश्यकतेनुसार बदल केला जाणार आहे. वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी १० वाजता सांडव्याद्वारे एकूण ७४६४ क्युसेक करण्यात आला आहे.पानशेत धरणा मधून नदीपात्रामध्ये सुरू असणारा २६०४ क्यूसेक विसर्ग वाढवून शुक्रवारी सकाळी आठ वाजता सांडव्याद्वरे ३९०८ क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे ६५० क्युसेक असा एकूण ४५५८ क्युसेक करण्यात आला आहे. मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग ३५ हजार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे टाटा पॉवरचे बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले आहे.

पवना धरणाच्या सांडव्याद्वारे सकाळी दहा वाजता ४२०० क्युसेक व विद्युत केंद्राद्वारे १४०० असा एकुण ५६०० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे अशी माहिती उपअभियंता अशोक शेटे यांनी दिली आहे.

या सोबतच चासकमान धरणातून दुपारी १.३० वाजता . सांडव्याद्वारे १२ हजार ६५० क्युसेक विसर्ग भिमा नदीत सोडण्यात आला आहे. भविष्यात पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो. तर कासारसाई मध्यम प्रकल्पातून कासारसाई नदी पात्रातून होत असलेला विसर्ग हा १ हजार ३५० क्युसेक्स एवढा करण्यात येत आहे. तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून विसर्ग वाढवून २० हजार क्युसेक करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या