Dahihandi 2024 mumbai : मुंबईत दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साऊंड सिस्टिम, लेझर शो, डॉल्बीचा दणदणाट, लावण्यांचा कार्यक्रम तसेच बॉलीवूड कलाकारांच्या उपस्थितीमुळे सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान या उत्साहाला गालबोट लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईत काल दहिहांडी उत्सवादरम्यान एकूण २४५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १७ जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. तर ७४ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईतील अनेक भागात आज सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह वाढला आहे. दहीहंडीच्या आयोजकांची लाखोंची बक्षीसे जाहीर केल्याने गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी ९ थर रचून सलामी देण्यात आली. यामध्ये थर कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी झाले आहेत.
जे जे रुग्णालय : २ जखमी (डिस्चार्ज)
सेंट जॉर्ज रुग्णालय : ०४ जखमी (२ दाखल, १ उपचाराधीन, १ डिस्चार्ज)
जीटी रुग्णालय : १ जखमी (डिस्चार्ज)
पोद्दार हॉस्पिटल : १६ जखमी सर्व डिस्चार्ज
केईएम रुग्णालय : १९ जखमी, ५ दाखल १५ उपचाराधीन.
सायन रुग्णालय : ११ जखमी (उपचाराधीन)
नायर रुग्णालय: ८ जखमी, १ उपचाराधीन, ७ डिस्चार्ज
राजावाडी रुग्णालय : ८ जखमी (३ अॅडमिट, ५ डिस्चार्ज)
एमटी अग्रवाल हॉस्पिटल : १ (अॅडमीट)
वीर सावरकर रुग्णालय : ३ जखमी ( डिस्चार्ज )
शताब्दी रुग्णालय : ६ जखमी (डिस्चार्ज)
कुर्ला भाभा रुग्णालय – २ जखमी , १ उपराधीन, १ डिस्चार्ज
बांद्रा भाभा रुग्णालय – ३ जखमी डिस्चार्ज.
ट्रामा केअर रुग्णालय – ५ जखमी, १ दाखल, ४ डिस्चार्ज.
व्ही एन देसाई रुग्णालय – ४ जखमी उपाराधीन.
एमडब्ल्यू देसाई – १ जखमी डिस्चार्ज.
कूपर रुग्णालय – १ जखमी डिस्चार्ज.
BDBA रुग्णालय – १० जखमी डिस्चार्ज.
लीलावती रुग्णालय – १ जखमी दाखल.
संबंधित बातम्या