
Mumbai Local train News : लोकल सेवा ही मुंबईची रक्तवाहिनी समजली जाते. आपल्या इच्छित स्थळी जण्यासाठी लाखो मुंबईकर लोकलचा वापर करत असतात. त्यात दादर रेल्वे स्टेशन हे महत्वाचे स्थानक आहे. येथून जलद आणि धीम्या गतीच्या लोकल सूटत असतात. मात्र, दादर स्थानकातील फलाट क्रमांक १ ची रुंदी वाढवली जाणार आहे तब्बल रुंदी साडेतीन मीटरने वाढवून १०.५ मीटर केली जाणार आहे. यामुळे येत्या शुक्रवार पासून फलाट क्रमांक २ बंद केला जाणार असल्याने. दादर स्थानकातून सोडण्यात येणारी धीमी लोकलसेवा आता बंद केली जाणार आहे. याचा त्रास प्रवाशांना होणार असून लोकल पाडण्यासाठी प्रवाशांना आता परळ स्थानक गाठावे लागणार आहे. शुक्रवार पासून लोकलच्या वेळा पत्रकात मोठे बदल होणार आहे.
मुंबईतील दादर रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. येतून मुंबईचे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्ग जोडले जातात. त्यामुळे दादर स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी जात असतात. तसेच दादर येथे येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. अवजड समान घेऊन सीएसएमटीहून प्रवाशांनी भरून येणाऱ्या लोकलमध्ये बसने हे कठीण काम असते. यामुळे दादर येथून फलात क्रमांक २ वरून धीम्या लोकलने नागरिक जात असतात.
दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून यात प्लॅटफॉर्म क्रमांक १ ची रुंदी वाढवली जाणार आहे. याचे काम हाती घेण्यात आल्याने पर्यायाने प्लॅटफॉर्म क्रमांक दोन देखील बंद ठेवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ची लांबी ही २७० मीटर आहे. तर रुंदी ही ७ मीटर आहे. ही रुंदी १०.५ मीटर करण्यात येणार आहे. १५ तारखेपासून हे काम सुरू केले जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एकूण २२ लोकल गाड्या या परळ टर्मिनसहून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे 'दादर लोकल' ही आता परळ स्थानकातूनच सोडण्यात येणार आहे.
या संदर्भात रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले, दादर स्थानकातील अप-डाउन धीम्या लोकल फेऱ्या या आता कायमस्वरूपी परळ स्थानकातून चालविण्यात येणार आहेत. यामुळे दादर लोकल बंद होऊन परळ लोकल सुरू करण्यात येणार आहे. दादर जलद लोकल मात्र वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी याची दखल घ्यावी.
परळ-कल्याण ८.१७ AM
परळ-कल्याण ९.४० AM
परळ-कल्याण १.०१ PM
परळ-डोंबिवली ५.५६ PM
परळ-कल्याण ६.१५ PM
परळ- कल्याण ६.४० PM
परळ-कल्याण ७.०८ PM
परळ-डोंबिवली ७.४४ PM
परळ-ठाणे ७.५४ PM
परळ-कल्याण ८.२३ PM
परळ-ठाणे २२.२५ PM
संबंधित बातम्या
