मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cyrus Mistry : साधं राहणीमान आणि उच्च विचार; सायरस मिस्त्रींचा ड्रायव्हरसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल
Cyrus Mistry Photo Viral On Social Media
Cyrus Mistry Photo Viral On Social Media (HT)

Cyrus Mistry : साधं राहणीमान आणि उच्च विचार; सायरस मिस्त्रींचा ड्रायव्हरसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल

11 September 2022, 16:07 ISTAtik Sikandar Shaikh

Cyrus Mistry Car Accident : अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरनजीक सूर्या नदीच्या पुलावर झालेल्या कार अपघातात टाटा उद्योग समुहाचे माजी चेयरमन सायरस मिस्त्री यांचं निधन झालं होतं.

Cyrus Mistry Photo Viral On Social Media : टाटा सन्सचे माजी चेयरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं काही दिवसांपूर्वी पालघरनजीकच्या सूर्या नदीच्या पुलावर झालेल्या कार अपघातात निधन झालं होतं. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. मिस्त्री यांच्यासह त्यांचे त्यांचे मित्र जहांगीर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. परंतु आता मिस्त्री यांच्या निधनानंतर त्याचे नातेवाईक, मित्र परिवार आणि जवळचे लोक त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सोशल मीडियावरही अनेक लोकांनी त्यांच्या स्वभावाबाबत आणि कामाच्या पद्धतीबाबत त्यांच्यासोबतचे अनुभव शेयर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अशातच आता त्यांचा साधेपणा आणि विनम्र स्वभाव दर्शवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोनुसार, मिस्त्री हे एका ढाब्यावर थांबून आपल्या ड्रायव्हरसोबत जेवणावर ताव मारताना दिसत आहे.

याशिवाय त्यांनी कोणतेही महागडे कपडे घातलेले नाहीत. अत्यंत साध्या ड्रेसमध्ये ते ड्रायव्हरसोबत बसलेले आहेत. हैदराबादच्या झोरोस्ट्रिअन्स नावाच्या फेसबुक पेजवरुन त्यांचा हा फोटो शेयर करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अत्यंत साध्या कपड्यांमध्ये सायरस मिस्त्री हे खाटेवर बसून जेवण करताना दिसत आहे. याशिवाय तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं त्यांचा फोटो काढला असता त्यांनी फोटोमध्ये स्मितहास्य केलेलं आहे. त्यांचा हा साधेपणा आणि बिनधास्त स्वभाव दर्शवणारा फोटो पाहून अनेक लोकांनी पसंती दिली आहे तर असंख्य लोकांनी त्याला सोशल मीडियावर शेयर केलं आहे.

विभाग