मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ येत्या २-३ तासांत बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ येत्या २-३ तासांत बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

May 26, 2024 10:21 PM IST

Cyclone Remal Updates : बांगलादेशातील संवेदनशील भागातील आठ लाखांहून अधिक लोकांना निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

रेमल चक्रीवादळ येत्या २-३ तासांत बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ धडकणार, अशी हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
रेमल चक्रीवादळ येत्या २-३ तासांत बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ धडकणार, अशी हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. (AP)

Cyclone Remal Updates: 'रेमाल' चक्रीवादळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ सागर बेटापासून (पश्चिम बंगाल) १२५ किमी दक्षिण-आग्नेय आणि खेपुपारा (बांगलादेश) पासून १३५ किमी नैर्ऋत्येला सायंकाळी ७.३० वाजता केंद्रित होते.

ट्रेंडिंग न्यूज

भारतातील बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीभागात बाहेरील क्लाऊड बँड आहे. येत्या काही तासांत या चक्रीवादळाला सुरुवात होईल, असे हवामान खात्याने ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. बंगालच्या उपसागरातील हे या मान्सूनपूर्व हंगामातील पहिले चक्रीवादळ असून हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार त्याला रेमल असे नाव देण्यात आले आहे.

  • रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची तयारी बांगलादेश करत असताना रविवारी असुरक्षित भागातील आठ लाखांहून अधिक लोकांना निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे.
  • बांगलादेशचे आपत्ती व्यवस्थापन व मदत राज्यमंत्री मोहम्मद मोहिबुर रहमान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित संस्थांना समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. 
  • चक्रीवादळाचा तडाखा बसण्यापूर्वी आम्ही १९ जिल्ह्यांतील सर्व असुरक्षित लोकांना चक्रीवादळ केंद्रापर्यंत आणू शकू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
  • बांगलादेशच्या डेली स्टार वृत्तपत्राच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेमल चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी सर्व मंत्रालये, विभाग आणि अधीनस्थ कार्यालयांच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Konkan Railway: कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मोठा अपघात टळला, नेमकं काय घडलं? वाचा

  • त्यामुळे चटगांव विमानतळावरील विमानसेवा आठ तासांसाठी बंद करण्यात आली आहे.
  • भारताच्या पश्चिम बंगालमध्ये 1 लाखांहून अधिक लोकांना संवेदनशील भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बंगालच्या किनारपट्टीभागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • राज्याच्या किनारपट्टीभागात राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या प्रत्येकी १६ बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. 

Mumbai-Nashik highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मत्यू, तीन जखमी

  • वादळी वाऱ्यासह आलेल्या चक्रीवादळामुळे राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. आयएमडीने रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या चेतावणी आणि सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
  • कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारपासून २१ तासांसाठी बंद करण्यात आली आहे.
  • रेमल चक्रीवादळाचा प्रतिसाद आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग