स्विम स्वॅपद्वारे सायबर चोरटे करू शकता तुमचे बॅंक खाते 'साफ'; काय आहे स्विम स्वॅप?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  स्विम स्वॅपद्वारे सायबर चोरटे करू शकता तुमचे बॅंक खाते 'साफ'; काय आहे स्विम स्वॅप?

स्विम स्वॅपद्वारे सायबर चोरटे करू शकता तुमचे बॅंक खाते 'साफ'; काय आहे स्विम स्वॅप?

Dec 25, 2024 08:22 PM IST

What Is Sim Swapping : सिम स्वॅपचा साधा सरळ अर्थ आहे की, सिम कार्ड बदलने किंला त्याच नंबरचे दुसरे कार्ड बनवणे. सिम स्वॅपिंगमध्ये तुमचा मोबाइल नंबरने एका नव्या सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर हे सिम कार्ड बंद केले जाते आणि तुमच्या मोबाइलमधून नेटवर्क गायब केले जाते.

काय आहे स्विम स्वॅप?
काय आहे स्विम स्वॅप?

What Is Sim Swapping : कांदिवलीच्या एका व्यावसायिकाच्या बँक खात्यावर सायबर चोरांनी स्विम स्वॅप करून तब्बल साडे सात कोटी रुपये हडप केल्याचा खळबळजन प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर वर्ध्यातील महिलेचीही सायबर चोरट्यांकडून १ लाखाची फसवणूक केल्याची घटना घ़डली आहे. त्यामुळे स्विम स्वॅप प्रकार चर्चेत आला आहे.

विशेष म्हणजे स्विम स्वॅप करून पैसे काढल्यानंतर एकही संदेश या खात्याला जोडण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर येत नाही. त्यामुळे स्विम सॅप करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कम एक झटक्यात गेल्याने व्यावसायिकाचे कुटूंब धास्तावलेले आहे. कांदिवलीच्या घटनेत स्विम स्वॅप केल्यामुळे व्यावसायिकाच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे मेसेज बँकेला सलंग्न मोबाईलवर आलेच नाहीत. आपल्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे नंतर समजल्यानंतर व्यावसायिकाने तत्काळ पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क केल्याने पोलिसांनी केवळ चार तासात साडेसात कोटींपैकी साडे चार कोटी रुपये वाचवले.

कांदिवलीतील व्यावसायिक एक खासगी कंपनी चालवतात. सोमवारी त्यांचे स्विम स्वॅप करून बेकायदा मार्गाने त्याचा वापर करून त्यांच्या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला. या खात्यातील साडे सात कोटी रुपये अन्यत्र वळवण्यात आले. याची ई-मेल द्वारे माहिती मिळताच व्यावसायिकाने साय़बर सेलशी संपर्क केला.

स्विम स्वॅप म्हणजे काय?

सिम स्वॅप एकटीदुकटी व्यक्ती करत नाही,त्यामध्ये अनेक लोकांचा समावेश असतो. ऑर्गनाइज्ड रॅकेटद्वारेच ते चालवले जातं. २०१८ या वर्षभरात भारतात सुमारे२००कोटी रुपये अशाप्रकारे पळवले गेले असल्याचं सायबर अँड लॉ फाऊंडेशनच्या अंतर्गत संशोधनामध्ये समोर आलं आहे.

सिम स्वॅपचा साधा सरळ अर्थ आहे की, सिम कार्ड बदलने किंला त्याच नंबरचे दुसरे कार्ड बनवणे. सिम स्वॅपिंगमध्ये तुमचा मोबाइल नंबरने एका नव्या सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर हे सिम कार्ड बंद केले जाते आणि तुमच्या मोबाइलमधून नेटवर्क गायब केले जाते.

सध्या सोशल मीडियावरून उद्योगपती व प्रतिष्ठीत व्यक्तींसोबत ओळख वाढवून त्यांचे सोशल इंजीनिअरींग करून वैयक्तिक तसेच त्यांच्या कामकाजाची माहिती करून घेतली जाते. यासाठी व्हायरस, एपीके फाईल किंवा मालवेअरचा उपयोग करूनही त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे -

सोशल मीडियावर काही एपीके फाइल तसेच काही फिशिंग लिंक्स पाठवून त्या डाऊनलोड करायला सांगितले जाते. या लिंकवर क्लिक करताच त्यांची आर्थिक व खासगी माहिती चोरट्य़ांकडे जाते. काही वेळा फसवणूक करणाऱ्य़ा एजन्सीज बँकांचा डेटाबेसही विकत घेतात. अशी माहिती मिळाल्यानंतर बनावट ओळखपत्र बनवून सिम ब्लॉक करण्याची तसेच नवीन ई सिम सक्रिय करण्याची विनंती मोबाईल कंपन्यांकडे केली जाते. एकदा का असे सिम मिळाल्यानंतर त्यावर ओटीपी मिळवून लोकांच्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार केले जातात.

यातून सावधानता बाळगण्यासाठी ग्राहकांनी बँक खात्याशी केवळ मोबाईल लिंक न करता ई-मेल अलर्टही कार्यान्वित करावे.

समाज माध्यमांच्या सेटिंगमध्ये जाऊन टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रीय करावे. यामुळे अनोळखी व्यक्तींना अनधिकृतपणे प्रवेश करता येणार आहे. आपले वैयक्तिक किंवा कंपनीच्या बँक खात्याशी सलंग्न सिम बंद झाल्यास संबंधित बँकेला तातडीने कळवून खात्याशी असलेली लिंक हटवावी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर