cultivation of opium in Pune Mavadi : पुण्यात एकीकडे तब्बल ३ हजार ५०० किलोचे ड्रग्स जप्त करत ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली. कुरकुंभमध्ये एका कारखान्यात एमडीचे होणारे उत्पादन देखील उघडकीस आणून ड्रग्जचा मोठा कारखाना बंद करण्यात आल्या आला होता. यानंतर आता तस्कर थेट कांदा आणि लसनाच्या शेतीच्या आडून अफूची शेती करत असल्याचे आढळले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवडजवळील मावडी क. प येथे एका शेतात ही लागवड सुरू होती. गुप्त बातमीदाराच्या मदतीने तब्बल ३५.२८ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली आहे. तब्बल ७६ हजार ६०० रुपये एवढी किंमत या मुद्देमालाची आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
किरण कुंडलीक जगताप (वय ४०) व रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, रा. कोडीत, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीं नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील सासवड येथे अफुची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली होती. ही घटना ताजी असतांना पुरंदर तालुक्यातील मावडी क. प येथे देखील एका शेतील अफूची गैर मार्गाने विनापरवाना लागवड होत होती. कांदा आणि लसुणाच्या शेतात ही अफुची लागवड केली जात होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण पोलिस दलाचा कार्यभर स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री सेवन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मावडी क. प मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जाते असल्याची माहिती मिळाली. जेजुरी व भोर पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी मावडी गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले. यावेळी तेथील दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी केली असता तेथे बेकायदेशीर विनापरवाना अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये, म्हणून कांदा व लसुण पिकाची लागवड करण्यात आली होती. ७६ हजार ५६० रुपयांचे ३८.२८ किलो वजनाची अफुची झाडे जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पाच दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची लागवड केलेल्या दोघांवर कारवाई केली होती. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीकांत पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब पवार, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्ष महेश पाटील, नामदेव तारडे, पोलिस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनही ही कामगिरी केली.