मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

May 17, 2024 09:34 AM IST

Railway megablock : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ ची कामे ही शेवटच्या टप्प्यात आली असून यामुळे येथून सुटणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Railway megablock : मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे सर्वात मोठे आणि जुने रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १० आणि ११ च्या विस्तारासंदर्भात कामे सुरू आहेत. प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवणार आहे. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. १७ मे, शुक्रवारी रात्रीपासून ते १ जूनपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्री सहा तासांचा ब्लॉक राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: राजकीय पक्ष करणार आज जिवाची मुंबई! शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकत्र, तर बीकेसीत इंडिया आघाडीची सभा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या अभियांत्रिकी आणि विद्युतीकरणाबाबत इंटरलॉकिंगची कामे हाती घेण्यात आली आहे. या साठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज पासून पुढील १५ दिवस हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रात्री १२.१४ वाजता सीएसएमटी-कसारा ही शेवटची लोकल धावणार आहे. तर सीएसएमटी ते भायखळा दरम्यान लोकल सेवा ही बंद ठेवण्यात आली आहे. रात्री ९.४३ वाजताची कर्जत-सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री १०.३४ वाजता सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल राहणार आहे. ठाण्याहून पहाटे ४ वाजताची सीएसएमटीकरिता पहिली लोकल सुटणार असून सीएसएमटी-कर्जत ही पहिली लोकल पहाटे ४.४७ वाजता सोडण्यात येणार आहे.

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

पनवेल स्थानकातून सुटणाऱ्या आणि रद्द झालेल्या गाड्या

सीएसएमटी-मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल स्थानकातून सुटणार आहे. तर मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यत चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या या बदलांची दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दादरहून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या

सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या दादर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तर भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, लखनऊ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्स्प्रेस, होसपेट जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस या दादर पर्यंत धावणार आहेत.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४