Ladaki Bahin yojana : 'लाडक्या बहिणीं'ची बँकांमध्ये तोबा गर्दी; पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड, कामकाजावर परिमाण-crowd of women at bank post office to withdraw money of ladki bahin yojana in state ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladaki Bahin yojana : 'लाडक्या बहिणीं'ची बँकांमध्ये तोबा गर्दी; पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड, कामकाजावर परिमाण

Ladaki Bahin yojana : 'लाडक्या बहिणीं'ची बँकांमध्ये तोबा गर्दी; पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड, कामकाजावर परिमाण

Aug 17, 2024 09:44 AM IST

Ladaki Bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिल्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा झाले. हे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी व ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी झाली होती.

Ladaki Bahin yojana : 'लाडक्या बहिणीं'ची बँकांमध्ये तोबा गर्दी; पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड, कामकाजावर परिमाण
Ladaki Bahin yojana : 'लाडक्या बहिणीं'ची बँकांमध्ये तोबा गर्दी; पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड, कामकाजावर परिमाण

Ladaki Bahin yojana : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली होती. मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला. काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ आज पुण्यात करण्यात येणार आहे. बालेवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी सरकारने जाहीर केल्यानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिल्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले. पैसे जमा झाल्याने हे पैसे काढण्यासाठी तसेच आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी गर्दी केली होती. अनेक महिलांचे खाते अपडेट नसल्याने तसेच केवायसी नसल्याने खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी महिला या पासबूक घेऊन बँकेत आल्या होत्या. अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने बँक व्यवस्थापणावर याचा ताण आला.

भिवंडी व ठाणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात शुक्रवारी महिलांनी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीला आवरताना बँक व्यवस्थापनाला नाकी नऊ आले. बहुसंख्य महिलांनी त्यांच्या खात्यात आलेले पैसे पहिल्याच दिवशी काढून घेतले. तर काहींनी बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली. तर काहींनी पासबुक प्रिंटिंग मशीनसमोर देखील रांगा होत्या.

महिलांच्या चेहऱ्यावर समाधान; रक्षा बंधन होणार गोड

ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होते. शनिवार आणि रविवारी बँकांना सुट्या असल्याने शुक्रवारिच महिला बँकेत दाखल झाल्याने मोठी गर्दी झाली. बँकेत पैसे झाल्याने आता महिलांचे रक्षाबंधन गोड होणार आहे.

विभाग