मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट- भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा; भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट- भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा; भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 16, 2023 05:02 PM IST

Bjp-shivsena Crisis : भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही बाजुंनी जोरदार राडा झाला.

Bjp-shivsena Crisis
Bjp-shivsena Crisis

राज्यात शिवसेना शिंदे गट वभाजपच्या नेत्यांकडून युतीत आलबेल असल्याचे सांगत असले तरी कल्याणमध्ये शिंदे गट व भाजपमध्ये कुरबुरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कल्याणमधील भाजप व शिवसेना शिंदे गटातील संघर्ष थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. आज पुन्हा दोन गटात राडा झाला. कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरात भिंतींवर भाजपकडून त्यांचे चिन्ह (कमळ) रंगवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही बाजुंनी जोरदार राडा झाला.

ट्रेंडिंग न्यूज

याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंवणार असल्याचेभाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी म्हटले आहे. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे. यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊअसा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला.

WhatsApp channel