kapil dev bought land in karjat : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव हे कर्जतकर झाले आहे. त्यांनी कर्जत येथे तब्बल १६ एकर जमिन खरेदी केली आहे. या जमीनिच्या व्यवहारासंबधी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कपिलदेव शुक्रवारी आले असता, त्यांच्या चाहत्यांनी तयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल. यावेळी कार्यालया बाहेरही त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांना देव यांच्या सोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
भारताला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप मिळवून देण्यात तत्कालीन कर्णधार कपिलदेव यांचा मोठा वाटा होता. कपिलदेव यांनी कर्जत तालुक्यातील मोग्रज गावाच्या हद्दीत १६ एकर जमीनखरेदी केली आहे. हेदवलीतील शेतकरी मोहन तुळशीराम गायकर यांची जमिन त्यांनी खरडे केली आहे. या व्यवहाराचे खरेदी खत शुक्रवारी (दि ९) करण्यात आले होते. या साठी कपिल देव हे नेरूळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते.
हा व्यवहार नेरळ येथील सहनिबंधक कार्यालय क्रमांक दोन येथे पार पडला. यावेळी येथील प्रभारी सहनिबंधक मंगेश चौधरी यांनी या व्यवहार नोंदवून घेतला. या व्यवहाराबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. कपिलदेव यांच्या दस्ताचा नंबर आला आणि त्यांचे वकील अॅड. भूपेश पेमारे त्यांना घेऊन कार्यालयात पोहोचले. दरम्यान, त्यांचे कार्यालात स्वागत करण्यात आले. कपिल देव आल्याचे समजताच अनेकांनी कार्यालबाहेर मोठी गर्दी केली होती.
कर्जत तालुक्यात याआधीही अनेक सेलिब्रिटींनी जमीनखरेदी केली आहे. अनेक लोकप्रिय खेळाडू, अभिनेते यांनी तालुक्यात विसाव्यासाठी फार्म हाऊस बांधले आहेत.