mahalakshmi mandir kolhapur : राज्यासह देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या मूर्तीच्या संवर्धनाबाबत तज्ज्ञ समितीने ८ पानी अहवाल न्यायालयाला दिला आहे. यात देवीच्या मूर्तीवर अनेक भागात तडे गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषत: मूर्तीच्या गळ्याखालील भागाची मोठी झीज झाली असल्याचे अहवालात म्हटले असून मूर्तीचे तातडीने संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील अंबाबाई देवीच्या मृती संवर्धना बाबत न्यायालयाने तज्ज्ञ समितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अंबाबाई महालक्ष्मी मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्यासमोर सुरू आहे. या बाबत गजानन मुनीश्वर व इतरांनी मूर्तीची पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायलयाने तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी १४ व १५ मार्च रोजी मूर्तीची पाहणी केली होती. या पाहिणीचा अहवाल गुरुवारी न्यायालयात त्यांनी सादर केला. या अहवालात अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पूर्वी म्हणजेच २०१५ साली अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी वापरण्यात आलेले साहित्य ही मृतीच्या मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ शकले नाही. यामुळे मूर्तीला तडे जाऊन थर निघत असल्याचे अहवालात म्हटले आहे. मूर्तीवरील अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे. सुनावणी प्रसंगी अॅड. नरेंद्र गांधी, वादी गजानन विश्वनाथ मुनीश्वर, अॅड. ओंकार गांधी, लाभेश मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई, अॅड. प्रसन्न मालेकर आदि उपस्थित होते.
अंबाबाई महालक्ष्मी मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची प्रमुक्याने झीज झाली आहे, तसेच देवीचे नाक, ओठ, हनुवटी यावर तडे गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे. रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्यामुळे ही तडे गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, मूर्तीसंवर्धनासाठी उपाय म्हणून ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून तडे गेलेल्या भाग बूजवता येईल. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागेल असे अहवालात म्हटले आहे. या सोबतच या पुढे रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागणार आहे. मूर्तीचे वेळोवेळी निरीक्षण करून तिची कली घावी लागणार आहे. मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घ्यावे, पुष्पहार न घालता उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालावे, गर्भगृहातील संगमरवर काढणे. कीटकांचा उपद्रव होऊ नये याकरता उपाययोजना कारवाया या सारख्या अनेक सूचना अहवलात करण्यात आल्या आहेत.