Maharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

Maharashtra Governor: सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

Jul 28, 2024 08:20 AM IST

C.P. Radhakrishnan appointed as Governor of Maharashtra: तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Appointments of Governors: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या राज्यपालपदाचा बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच त्यांनी इतर राज्यांतील राज्यपालांच्या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. तर, र भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ दोन वेळा विजय मिळवला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

 

नव्या राज्यपालांची नियुक्ती

१) हरिभाऊ बागडे: हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२) जिष्णुदेव वर्मा: जिष्णुदेव वर्मा यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

३) ओम माथुर: ओम प्रकाश माथुर यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

४) संतोष कुमार: संतोष कुमार गंगवार यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

५) रामेन डेका: यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

६) सीएच विजयशंकर: मेघालयच्या राज्यपालपदी सीएच विजयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

७) सीपी राधाकृष्णन: तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

८) गुलाबचंद कटारिया: सध्या आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची पंजाब आणि चंदीगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

९) लक्ष्मणप्रसाद आचार्य: सध्या सिक्कीमचे राज्यपाल असलेले लक्ष्मणप्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. हे बदल अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासकीय नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल दर्शवितात.

बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या राज्यपालपदाचा बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारला. ८३ वर्षीय बनवारीलाल पुरोहित यांनी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात वैयक्तिक कारणदेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. चंदीगड ही पंजाब आणि हरयाणाची संयुक्त राजधानी आहे.'वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही बांधिलकीमुळे मी केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या राज्यपाल आणि प्रशासक पदाचा राजीनामा देतो. कृपया ते स्वीकारा', असे पुरोहित यांनी आपल्या पत्रात म्हटले.

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर