FIR against caretaker for cow's death in Thane : ठाण्यात गेल्या महिन्यात स्वामी नारायण मंदीरा समोर एका गायीचा मृत्यू झाला होता. या गायीचा मृत्यूप्रकरणी नवी मुंबईत गाईच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे, शुक्रवारी वाशी पोलिस ठाण्यात कलम ४२९ (हत्ती, उंट, घोडा, खेचर, म्हैस, बैल, गाय किंवा बैल यांना विष देऊन मारणे, अपंग करणे किंवा निरुपयोगी करणे) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामीनारायण मंदिरा समोर गायीची निगा राखणाऱ्या गोठ्यातील एका सेवकाने तिची योग्य काळजी घेतली नसल्याने २१ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला. तसेच गाईच्या मृतदेहाची विल्हेवाट न लावता त्याने पळ काढला होता. या प्रकरणी मधु शंकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देत दान मागण्यासाठी जबरदस्तीने गायी बांधल्या जात असल्याचा आरोप करत अशांवर कारवाईची मागणी केली. गाय सांभाळणारे अवैधरित्या पैसे कमवतात आणि सार्वजनिक जागा बळकावतात. एनएमएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्राण्यांच्या क्रूरतेवर कारवाई करण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. गायीचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
या संदर्भात मधू शंकर म्हणाले: "अनेक गायींना शहरातील विविध मंदिरांबाहेर बळजबरीने बांधले जात आहे. त्यांचा वापर भक्तांसमोर भीक मागान्यासाठी केला जातो. सेक्टर २९ मधील स्वामीनारायण मंदिराबाहेर ही गाय बांधून ठेवण्यात आली होती. १५ दिवसांपूर्वी तिचा अचानक मृत्यू झाला. यानंतर तिचा मालक हा तेथून पळून गेला. या प्रकरणी महानगरपालिकेकडे देखील तक्रार केली आहे की, शहरातील मंदिरांबाहेरच्या फूटपाथवर भीक मागण्यासाठी गायी बांधल्याच्या या प्रकरणाची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवावे.
वाशी येथील जवळच्या इमारतींमधून गोळा केलेले सीसीटीव्ही फुटेजही पुढील तपासासाठी पोलिसांना देण्यात आले आहे, गायीच्या मृत्यूनंतर आता काही लोक स्वामीनारायण गुरुकुल मैदानात गायी पाळत आहेत. गायीचे सेवक गायींना खायला घालण्यासाठी त्यांचे लाडू खरेदी करण्यास सांगतात. या द्वारे पैसे कमावले जातात. हे थांबवले पाहिजे.
जनावरांना भीक मागण्यास भाग पाडल्याबद्दल गाय संरक्षक आणि त्यांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी आणखी एका कार्यकर्त्याने केली आहे. अनेकदा गायींना मंदिराबाहेर लहान दोरीने बांधले जाते, त्यामुळे त्यांच्या मानेला इजा होते. त्यांना खान्यासाठी देखील काही दिले जात नाही.