मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  viral news : पत्नीला 'सेकंड हँड' म्हटलं म्हणून ३ कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

viral news : पत्नीला 'सेकंड हँड' म्हटलं म्हणून ३ कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 27, 2024 10:31 AM IST

husband to give 3 crore compensation to wife : एका व्यक्तीला आपल्या पत्नीला सेकंड हँड म्हणणे चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाने तब्बल ३ कोटी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

एका व्यक्तीला आपल्या पत्नीला सेकंड हँड म्हणणे चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाने तब्बल ३ कोटी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
एका व्यक्तीला आपल्या पत्नीला सेकंड हँड म्हणणे चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाने तब्बल ३ कोटी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

husband to give 3 crore compensation to wife : नवरा बायकोचं नातं काही वेगळं असतं. अनेक जण आपल्या जोडीदाराची गंमत जंमत करत असतात. काही वेळा ही गंमतजंमत खेळीमेळीच्या वातावरणात होते. तर काही वेळा याचे उलट परिमाण देखील होतात. अशा बोलण्यामुळे जोडीदार दुखावून प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीला सेकंड हँड बोलणे चांगलेच महागात पडले आहे. दुखावलेल्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली असून कोर्टाने पतीला त्याच्या पत्नीला ३ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर, सांगली राखली! नाशिकमध्ये नवा चेहरा

अमेरिकेचा नागरिक असलेल्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, पत्नीवर घरगुती हिंसाचार केल्यामुळे तिच्या स्वाभिमानावर परिणाम होतो. तर तिला “सेकंड हँड” म्हणून हिणवले गेले. तसेच हनीमूनच्या वेळी तिला पतीने मारहाण देखील केली. यामुळे उच्च न्यायालयाने या याचिका करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फटकारले. वेगळ्या राहणाऱ्या पत्नीला ३ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं पतीला दिले.

Mumbai Crime : गेल्यावर्षी होळीच्या दिवशी नग्नावस्थेत मृत आढळलेलं जोडपं; मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य अमेरिकेचे नागरिक असून दोघांचे लग्न हे १९९४ च्या ३ जानेवारीला मुंबईत झाले होते. त्यांनी दुसरे लग्नही अमेरिकेत केले. दरम्यान, ते अमेरिकेतून परत भारतात येत मुंबईत २००५-२००६ पासून मुंबईत राहत आहेत. पत्नी ही मुंबईत एका कंपनीत कामाला होती. यानंतर दोघांत वाद झाल्याने पत्नी ही तिच्या आईच्या घरी गेली. तर २०१४-१५ मध्ये पती पुन्हा अमेरिकेला गेला आणि त्याने २०१७ मध्ये त्याने तिथल्या कोर्टात घटस्फोटाची अर्ज दाखल केला. या बाबतची नोटिस देखील कोर्टाने पत्नीला पाठवली. तर पत्नीने देखील मुंबई दंडाधिकारी न्यायालयात घरगुती हिंसाचार (डीव्ही) कायद्यांतर्गत याचिका दाखल केली. २०१८ मध्ये अमेरिकेतील एका कोर्टाने या जोडप्याचा घटस्फोट मान्य केला.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना संगमनेरमध्ये केला उद्ध्वस्त

यात पत्नीने अनेक आरोप पटीवर केले. ते दोघे हनीमूनला नेपाळला गेले असतांना पतीने पत्नीला ‘सेकंड हॅन्ड’ म्हणत तिला मानसिक त्रास दिला. तिचा आधीचा साखरपुडा तुटल्याने तो तिला हिणवत होता. दोघेही अमेरिकेत गेल्यावर पटीने पतींवर घरगुती हिंसाचार केला. एवढेच नाही तर तो तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. तिला त्याने मारहाण करत ही बाब मान्य करायला लावली.

पीडित महिलेने कोर्टात सांगितले, की तिचे आई-वडील २००० मध्ये अमेरिके गेले असता त्या ठिकाणी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाला. या परिस्थितीत पतीने तिला वडिलांसोबत राहण्यास मनाई केली. भारतात परत आल्यावर देखील पतीने तीचे इतर पुरुषांशी संबंध असल्याचा आरोप करत तिचा मानसिक छळ केला. न्यायालयाने पतीला २०१७ पासून पत्नीला दरमहा दीड लाख रुपये आणि भरपाई म्हणून ३ कोटी रुपये दोन महिन्यांत देण्याचे आदेश दिले होते. तर ५० हजार रुपये खर्चही पतीला करण्यास सांगितले होते. हा आदेश न्यायालयाने कायम ठेवला आहे.

WhatsApp channel