मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अविनाश भोसले यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेण्यास ईडीला परवानगी

अविनाश भोसले यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेण्यास ईडीला परवानगी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 27, 2022 11:01 PM IST

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकअविनाश भोसले यांना डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला ताब्यात घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

अविनाश भोसले
अविनाश भोसले

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला ताब्यात घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने अविनाश भोसलेंना अटक केली आहे. 

डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ताब्यात घेण्याची ईडीला परवानगी दिली. ईडीने त्यांच्याविरुद्ध चौकशीसाठी प्रोडक्शन वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. 

येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थित गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केलं होतं. येस बँकेने एप्रिल ते जून २०१८ या काळात डीएचएफएलमध्ये अल्प-मुदतीच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिसेंबरमध्ये ३ हजार ९८३ कोटी गुंतवले. तसेच येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी ७५० कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. यात कपिल वाधवाननं डीएचएफएलच्या माध्यमातून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येस बँकेकडून कर्जाच्या नावाखाली ६०० कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. 

याशिवाय भोसलेंना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला दिल्याबद्दल शुल्क रक्कम मिळाली आहे. प्रकल्पाचा खर्च, वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा करार, वित्तीय मूल्यांकन व संरचना आदींबाबत भोसलेंच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याची माहिती तपासयंत्रणेकडे उपलब्ध आहे.

IPL_Entry_Point

विभाग