Mumbai Rain : मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली कार, मुंबई पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले जोडप्याचे प्राण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली कार, मुंबई पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले जोडप्याचे प्राण

Mumbai Rain : मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली कार, मुंबई पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले जोडप्याचे प्राण

Updated Jul 08, 2024 04:15 PM IST

Mumbai Rains : मालाड येथील साईनाथ सबवेखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. येथे एक कार अडकली आहे. कारमध्ये अडकून पडलेल्या जोडप्याची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका करण्यात आली.

मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली कार
मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली कार

मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे,डोंबिवली भागांमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून याचा परिणाम लोकल रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवेवरही झाला आहे. दरम्यान मालाड येथील साईनाथ सबवेखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. येथे एक कार अडकली आहे. कारमध्ये अडकून पडलेल्या जोडप्याची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका करण्यात आली. हे दृष्य पाहून मनात धडकी भरते.

मुसळधार पावसाने मालाड भुयारी मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सब वे खाली साचलेल्या पाण्यात कार अडकली आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठा टेम्पो अडकला आहे. क्रेनच्या सहाय्याने पाण्यात बुडलेली कार बाहेर काढण्यात आली. सध्या पाऊस थांबला असून,भुयारी मार्गातील पाणी हळूहळू कमी होत आहे. भुयारी मार्गात अडकलेला टेम्पो टोइंग व्हॅनद्वारेवाहतूक पोलिसांनी बाहेरकाढला. मालाड सबवेमध्ये अडकलेल्या कारची क्रेनच्या मदतीने सुटका करण्यात आली. मुंबई पोलिसांनी कारमध्ये अडकलेल्या जोडप्याला सुखरुपपणे बाहेर काढले.

मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. कुर्ला, चुनाभट्टी,सायन परिसरात पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवरही साचलं होतं. हार्बर मार्गावरच्या रेल्वेही उशिराने धावत आहेत. तर काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरु असतानाच त्यांना प्रचंड गर्दीचाही सामना करावा लागतो आहे.

मुंबई शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी पावसाच्या स्थितीचा आढवा घेत सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

दक्षिण मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे, याला एक तासापासून सलग पाऊस सुरू आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे असलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून लांब केले असून नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. समुद्राच्या बाजूने रस्सी बांधून पर्यटकांना समुद्र जवळ येण्यापासून थांबवले जात आहेतसेच क्लाऊड स्पीकर वरून सर्व पर्यटकांना समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या