मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Corona Virus ; राज्याची चिंता वाढली, मुंबईतही एका दिवसात आढळले १२४२ रुग्ण

Corona Virus ; राज्याची चिंता वाढली, मुंबईतही एका दिवसात आढळले १२४२ रुग्ण

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 07, 2022 07:20 PM IST

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात करोना रुग्णवाढीनं चांगलाच जोर धरला आहे. काही शें च्या घरात असलेली वाढ आता काही हजारात आली आहे

राज्यात पुन्हा वाढले करोना रुग्ण
राज्यात पुन्हा वाढले करोना रुग्ण (हिंदुस्तान टाइम्स)

राज्यावर करोनाचं (Corona)संकट पुन्हा एकदा गहिरं होत चाललं आहे. गेले आठवडाभर काही शे रुग्ण सापडत असल्याचं पाहायला मिळत होतं. आता मात्र गेल्या दोन दिवसात हीच रुग्णवाढ (Patients) काही हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासात राज्यात (Maharashtra) १ हजार ८८१ नवे रुग्ण आढळत असून त्यातले १ हजार २४२ रुग्ण एकट्या मुंबईत (Mumbai) पाहायला मिळाले आहेत. मुंबई आणि मुंबईकरांसाठी ही एक चिंतेची बाब मानली जात आहे. 

महाराष्ट्रात आज ८७८ रुग्णांनी करोनावर विजय मिळवला आहे. आजवर ७७ लाख ३९ हजार ८१६ इतकं करोनामुक्त झालल्यांचा आकडा आहे.तिथंच राज्यात आज शून्य करोनामृत्यू झाले. आज राज्यात आढळलेल्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांच्या नोंदीने राज्यात करोना बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही ७८ लाख ९६ हजार ११४ इतकी झाली आहे.

राज्यासाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे राज्यात होत असलेली सक्रीय करोना रुग्णसंख्या. राज्यात आजच्या घडीला ८ हजार ४३२ करोना रुग्ण आहेत. त्यात मुंबईत ५ हजार ९७४ करोना रुग्ण आहेत तर ठाण्यात १ हजार ३१० सक्रीय करोना रुग्ण आहेत.

देशातही गेल्या २४ तासात करोना रुग्णाची वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासात ३ हजार ७१४ नवे करोना रुग्ण पाहायला मिळत आहेत

गेल्या एक आठवडयापासून राज्यात करोनाबाधितांच्या संख्येनं उसळी घेतली असल्याचं चित्र आहे. आता मात्र राज्य सरकारला  टास्क फोर्सने पुन्हा एकदा काही महत्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. यात सर्वात महत्वाची शिफारस म्हणजे गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क  वापरणं बंधनकारक करावं अशी महत्वाची सूचना या टास्क फोर्सने केली आहे.

सार्वजनिक स्थळं, गर्दीची ठिकाणं, सिनेमा हॉल, नाट्यगृह, मॉल,धार्मिक स्थळं, उद्यानं अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक करावं असं राज्य सरकारला सुचवण्यात आलं आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने टास्क फोर्सने ही अत्यंत महत्वपूर्ण सूचना राज्य सरकारला केली आहे. काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मास्क वापरावा असं आवाहन केलं होतं. मात्र मास्क न वापरल्यास दंडाचा कोणताही विचार सध्या नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं. सध्या करोना रुग्णांमध्ये ताप येणं हे प्रमुख लक्षण आढळून येत आहे. राज्यातल्या काही नेत्यांनाही करोनाची लागण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ९९ पेक्षा जास्त ताप असल्यास RAT/RTCR चाचणी केली गेली पाहिजे. संबंधित व्यक्तीची ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची चाचणी केली पाहिजे, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे. अशा करोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइन अत्यंत महत्वाचं असल्याचं टास्क फोर्सचं म्हणणं आहे.

IPL_Entry_Point

विभाग