मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सावधान.. कोरोना पुन्हा येतोय, सोलापुरात वृध्द महिलेचा मृत्यू, ८ नवे रुग्ण

सावधान.. कोरोना पुन्हा येतोय, सोलापुरात वृध्द महिलेचा मृत्यू, ८ नवे रुग्ण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 14, 2023 11:44 PM IST

Corona virus : सोलापुरातकोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे.मंगळवारी एका ८० वर्षांच्या वृध्द महिलेचाकोरोनामुळे मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

देशात इंफ्यूएंजा व्हायरसने धुमाकूळ घातला असताना आता कोरोनाच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. सोलापुरात कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. मंगळवारी एका ८० वर्षांच्या वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ८ नवे रूग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित सक्रीय रुग्णसंख्या १५ झाली आहे. 

रेल्वे लाईन्स भागातील बुबणे चाळीत राहणाऱ्या एका ८० वर्षांच्या वृध्द महिलेला दमा आणि पक्ष्याघाताचा आजार होता. तिच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. 

उपचार सुरू करण्यापूर्वी तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी १२८ संशयित रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यापैकी ८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यात तीन पुरूष तर पाच महिलांचा समावेश आहे. सध्या शहरात १५ करोनाबाधित वैद्यकीय उपचाराधीन आहेत. मागील १५ दिवसांपासून कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. ताप,  खोकला, दमा, श्वसनाचा त्रास असलेल्या रूग्णांची संख्या वाढत असून बहुसंख्य रूग्णालयांमध्ये रूग्ण वाढले आहेत.

भारतात इंफ्लूएंजाचा सब-टाइप एच3एन2 च्या प्रकरणात वृद्धी होत असतानाच केंद्र सरकारने काही राज्यात कोविड-१९ संक्रमण दरात होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करत यावर तत्काळ उपाय योजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना इंफ्लूएंजा सारख्या आजारावर (आयएलआय) या गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (एसएआरआय) च्या प्रकरणात दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राज्यांना म्हटले आहे की, औषधे व ऑक्सीजनचा पुरवठा सुनिश्चित करावा. कोविड-१९ आणि इन्फ्लूएंजा विरुद्ध लसीकरणाबाबत तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग