मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेच्या बॅंक खात्याच्या मालकीवरून वाद; उद्धव गटाविरोधात पोलिसात तक्रार

शिवसेनेच्या बॅंक खात्याच्या मालकीवरून वाद; उद्धव गटाविरोधात पोलिसात तक्रार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 30, 2024 10:41 PM IST

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला,त्यामुळे शिवसेना पक्षाच्या बँकेतील ठेवीवर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अधिकार मिळाला, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde

शिवसेनेच्या बँक खात्याचा व आर्थिक व्यवहारांचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाविरुद्ध मुंबई पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल करत माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे खजिनदार बालाजी किणीकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, जून २०२२ पासून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अनेक कायदेशीर प्रक्रिया व सुनावणीनंतर फेब्रुवारी २०२३ महिन्यात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केले. त्यानंतर १० जानेवारी २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. यामुळे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हेच अधोरेखित झाले. यामुळे शिवसेनेच्या बँक खात्यावर व आर्थिक व्यवहारांवर शिंदे यांचे नियंत्रण आले. मात्र पक्षाचा आर्थिक तपशील जसे लॉगिन आयडी व पासवर्ड आधीच्या नेत्यांकडे राहिला. त्यांच्याकडून त्याचा अवैध वापर केला जात आहे. टीडीएस फाईल करण्यासाठी त्यांच्याकडे लॉगिन आयडी व पासवर्ड मागण्यात आला मात्र आम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नाही. याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.   

निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या बँकेतील ठेवीवर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अधिकार मिळाला.

दरम्यान ऑगस्ट २०२३ मध्ये शिवसेना पक्षाचे खाते असलेल्या एसबीआय बॅंकेतील दोन एफडी आणि बॅंक खात्यातील ठेवी असे एकूण ५० कोटी रुपये परत मिळवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी एसबीआय बॅंकेला विनंती पत्र पाठवले होते, मात्र बॅंकेने हे पत्र अधिकृत नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले होते.

WhatsApp channel