Baramati TC Collage murder : पुणे- बारामती शहरातील मध्यवर्ती तुळजाराम चतुरचंद (टी. सी) महाविद्यालयात १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघांजणांनी चाकूने हल्ला करून खून केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली. महाविद्यालय सुरू असतानाच आवारात अल्पवयीन चा खून झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दूसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थव पोळ (वय १७) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्थव पोळ हा बारावीत शिकत होता. तुळजाराम चतुरचंद (टी. सी) महाविद्यालयात शिक्षण घेत होता. कॉलेजच्या बाहेर आज सकाळी सर्व विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अर्थव पोळ व त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी अथर्व वर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार एक महिन्यांपूर्वी अर्थव आणि आरोपींमध्ये दुचाकीला कट मारण्यावरुन वाद झाला होता. या कारणावरून आज सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून अथर्वची हत्या करण्यात आली आहे.
आज अथर्व कॉलेजमध्ये आला असता आरोपी आणि त्याची बाचाबाची झाली. दोघेही हमरीतुमवरीवर आले. याच वेळी आरोपींनी अर्थव पोळवर कोयत्याने वार केले. या घटनेत अथर्व गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी पळून गेले. अर्थवला तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दूसरा आरोपी फरार आहे. पोलीसांनी महाविद्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. खून झालेला अथर्व पोळ हा बाहेरील गावातील असून तो शिक्षणासाठी बारामतीत आला होता. एक महिन्यापुर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे.
संबंधित बातम्या