संगमनेरमध्ये इतका उद्रेक का झाला? जयश्री थोरात यांच्याविषयी असं काय बोलले भाजपचे नेते वसंत देशमुख? वाचा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संगमनेरमध्ये इतका उद्रेक का झाला? जयश्री थोरात यांच्याविषयी असं काय बोलले भाजपचे नेते वसंत देशमुख? वाचा!

संगमनेरमध्ये इतका उद्रेक का झाला? जयश्री थोरात यांच्याविषयी असं काय बोलले भाजपचे नेते वसंत देशमुख? वाचा!

Updated Oct 26, 2024 12:01 PM IST

Vasant Deshmukh On Jayashree Thorat : संगमनेर येथील धांदरफळ येथे मंचावर सुजय विखे पाटील उपस्थित असताना जेष्ठ भाजप नेते वसंत देशमुख यांची जीभ घसरली त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. यामुळे संगमनेर पेटले आहे.

भाजप नेते वसंत देशमुखांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेर पेटले! जयश्री थोरातांचा रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
भाजप नेते वसंत देशमुखांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेर पेटले! जयश्री थोरातांचा रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या

Vasant Deshmukh On Jayashree Thorat : राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत जेष्ठ भाजप नेते वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संगमनेरच वतावरणे पेटले आहे. 

धांदरफळ येथे भाजपच्या सभेत भाजपच्या एका जाहीर सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमण झाले आहे. धांदरफळ बंद करण्यात आले असून रात्री गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. वसंत देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी या साठी जयश्री थोरात यांनी रात्रभर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

काय म्हणाले वसंत देशमुख ?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. भर सभेत सुजय विखे मंचावर असताना भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत देशमुख यांची जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलतांना जीभ घसरली. वसंत देशमुख हे बाळासाहेब थोरात यांना उद्देशून म्हणाले, आपल्या कन्येला समजवा...नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजय विखे पाटील हे त्यांना ताई म्हणतात. कारण ते सुसंस्कृत आहेत. या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहीत आहेत. वसंत देशमुख यांच्या या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जाळपोळ करत गाड्या फोडल्या. तर आज गावात बंद ठेवण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी केला निषेध

वसंत देशमुख यांच्या विधानाचा धांदरफळ ग्रामस्थांनी निषेध केला आहे. काल रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गावात सुजय विखे पाटील यांच्या पोस्टरला काळे फासले तर काही ठिकाणी शाई फेकण्यात आली. गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. आज सकाळपासून गावात शांतता असून धांदरफळ गाव बंद ठेवण्यात आले आहे.

जयश्री थोरात यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

वसंत देशमुख यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी रात्री १० वाजता जयश्री थोरात या शेकडो कार्यकर्त्यांसह संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर जात त्यांनी आंदोलन केले. तसेच वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी टयांनी केली. सकाळ पर्यंत सुमारे सात तास त्यांनी आंदोलन केले. यानंतर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या