मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Poster War In Worli : युवासेनेनं फाडले भाजपचे पोस्टर; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात तणाव

Poster War In Worli : युवासेनेनं फाडले भाजपचे पोस्टर; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात तणाव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 04, 2022 08:12 AM IST

Poster War In Mumbai : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना, शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय संघर्ष पेटला आहे.

Shiv Sena vs BJP-Shinde Group On Poster
Shiv Sena vs BJP-Shinde Group On Poster (HT)

Shiv Sena vs BJP-Shinde Group On Poster : ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर युद्ध रंगलं आहे. याआधी शिंदे गटाच्या समर्थकांनी शिवसेनेचे पोस्टर फाडले होते, त्यानंतर आता युवासेनेनं आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजपचे पोस्टर फाडल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय 'अंगावर आलात तर शिंगावर घेऊ', असा इशारा युवासेनेकडून शिंदे गट आणि भाजपला देण्यात आला आहे. त्यामुळं आता ऐन गणेशोत्सवाच्या काळात राजकीय पक्षांमध्ये पोस्टरबाजीवरून वाद पेटला आहे.

नेमकं काय झालं?

काल शिंदे गटाच्या समर्थकांनी मुंबईत शिवसेनेचे पोस्टर फाडले होते. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी वरळीतील एका बसस्टॉपवर भाजपकडून लावण्यात आलेले पोस्टर फाडले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्यानंही शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद पेटल्याचं बोललं जात आहे. आता राजकीय संघर्षातून बॅनर किंवा पोस्टर उतरवणे, फाडणे, असे प्रकार समोर आले आहे. कारण वरळीतील श्रीराम मिल बसस्टॉपवर लावण्यात आलेलं आलेलं भाजपचं पोस्टर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलं आहे. याशिवाय भाजपच्या लोकानी आधी शिवसेनेचं पोस्टर फाडल्याचा आरोपही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजपनं मुंबई महापालिकेत बहुमतासह भाजपचाच महापौर बसवणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेकडूनही मुंबई महापालिकेत बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजप हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न...

गणेशोत्सवाच्या निमित्तानं वरळीत शिवसेनेसह भाजपनंही जोरदार पोस्टरबाजी केली आहे. वरळी हा शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळं भाजप आणि शिंदे गटाकडून वरळीत ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी विषेश लक्ष दिलं जात आहे. त्यामुळंच आता शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर पाहायला मिळत आहे.

IPL_Entry_Point