IAS Pooja Khedkar Mother : IAS पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; शेतकऱ्यावर रोखले पिस्तूल; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IAS Pooja Khedkar Mother : IAS पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; शेतकऱ्यावर रोखले पिस्तूल; पाहा व्हिडिओ

IAS Pooja Khedkar Mother : IAS पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; शेतकऱ्यावर रोखले पिस्तूल; पाहा व्हिडिओ

Updated Jul 12, 2024 02:17 PM IST

IAS Probationer Pooja Khedkar mother viral video:पुण्यातील ट्रेनी आयएसअधिकारी पूजा खेडकर यांच्या सोबत आता त्यांच्या कुटुंबियांचे कारनामे देखील उघडकीस येत आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करतांना दिसत आहे.

 ट्रेनी आयएएस पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांवर केली दादागिरी
ट्रेनी आयएएस पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांवर केली दादागिरी

IAS Probationer Pooja Khedkar mother viral video : ट्रेनी असतांनाही आलीशान गाडीवर अंबर दिवा आणि जिल्हाधिकारी होण्यापूर्वी रुबाब करत वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिन बळकवणाऱ्या आयएएस पूजा यांचे अनेक कारनामे उघड होत असतांना आता त्यांच्या कुटुंबीयांच्या देखली अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करतांना दिसत आहे. यात त्या महिला बाऊन्सर सोबत शेतकऱ्याच्या अंगावर देखील धावून जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या पूर्वी मनोरमा यांच्या घरी माध्यम प्रतिनिधी गेले असता, त्यांना त्यांनी दमदाटी करत जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती.

प्रोबेशन काळात पुण्यात नियुक्तीला आलेल्या आयएएस पूजा खेडकर यांनी त्यांच्या आलीशान ऑडी गाडीला परवानगी नसतांना अंबर दिवा लावला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कक्ष बळकावत त्यांनी तेथे त्याचे कार्यालय थाटत स्वत:च्या नावाची पाटी देखील लावली होती. तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सोबत देखील त्यांनी गैरवर्तन केले होते. यामुळे त्यांचा १५ पानी अहवाल राज्य सरकार आणि यूपीएससीला पाठवून त्यांची बदली ही वाशिम जिल्ह्यात करण्यात आली होती.

दरम्यान, पुजा यांनी चुकीच्या मार्गाने आयएएस मिळवल्याचे देखील पुरावे पुढे आले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत अतांना आता पूजा खेडकर यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबीय देखील चर्चेत आले आहे. काल माध्यम प्रतिनिधी पूजा यांच्या घरी केले असता, त्यांची आई मनोरमा खेडकर यांनी ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर व पत्राकरांवर अरेरावी करत त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती. हा प्रकार ताजा असतांना मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ही कुटुंब आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या व्हिडीओमध्ये पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या मुळशी तालुक्यात एका जमीनीच्या वादातून शेतकऱ्यांसोबत हुज्जत बाजी आणि शिवीगाळ करतांना दिसत आहे. यावेळी त्या त्यांच्या हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं देखील दिसत आहे. त्यांच्या सोबत काही महिला बाऊंसर देखील असून त्या देखील या शेतकऱ्याला दमदाटी करतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी व्हिडीओत रेकॉर्ड झाली आहे. शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरांचा प्रयत्न असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण ?

पूजा खेडकर यांचे वडील माजी आयपीएस अधिकारी दिलीप खेडकर यांनी बेहिशेबी संपत्ती कमावली आहे. यातून त्यांनी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. अशीच के जमिन मुळशी तालुक्यातील एका गावात २५ एकर जमीन त्यांनी खरेदी केली कसून त्यांनी शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या शेतजमीनिवर अतिक्रमण केले आहे. हा वाद कोर्टात सुरू असतांना संबंधित शेतजमीनीवर जाऊन जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल आणि बाऊन्सर घेऊन शेतकऱ्यांना धमकावले. दरम्यान, खेडकर कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात देखील शेतजमिन खरेदी केली असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघड केली आहे. वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांनी १४ गुंठे जमीन घेतली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर