Mumbai police : राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी उघडकीस येत आहे. सायबर चोरट्यांनी फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लूप्त्या वापरत असल्याचं देखील पुढं आलं आहे. सायबर चोरट्यांनी आता फसणवुकीचा नाव फंडा वापरत आहेत. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जाते. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
सायबर चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवूक, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन पार्सल या सारख्या माध्यमान्यतून फसवूक केली जाते. नागरिकांच्या फोनवर काही लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला भाग पडून बँकांतून थेट रक्कम लंपास करण्यात आल्याच्या अनेक घटना देखील उघडकीस आल्या आहेत.
सायबर चोरटे हे स्वतःला सीबीआय, पोलीस, ईडी किंवा लष्करी अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना व्हिडीओ कॉल करतात. यात संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून त्यांना अटक केली जाणार असल्याची बतावणी करतात. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना पैशाची मागणी केली जाते. यासाठी डेबिट कार्डचा पासवर्ड विचारून त्यांचे बँकेतील खाते रिकामे केले जाते.
या सोबतच सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर देखील संपर्क साधला जातो. ही बाब मुंबई पोलिसांच्या लक्षात आली असून अशा प्रकारच्या फसवणुकीचे कॉल आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता थेट पोलिसांशी संपर्क साधून शहानिशा करावी. या साठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक्सवर पोस्ट करून या बाबत जागरूक राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
सायबर गुन्हेगारानी फोन केल्यास तसेच गुन्ह्यांत अडकण्याची भीती दाखवल्यास घाबरून जाऊ नये. कारवाईची धमकी दिल्यावर थेट फोन बंद करावा. या बाबत घरच्यांना माहिती द्यावी. सायबर चोरट्यांनी पैशाची मागणी केली तर ते पैसे त्यांना न देता थेट पोलीसांशी संपर्क साधून त्यांना याची माहिती द्यावी.