Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय आता १८ वरून १४ करणार; अजित पवार करणार अमित शहांशी चर्चा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय आता १८ वरून १४ करणार; अजित पवार करणार अमित शहांशी चर्चा

Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय आता १८ वरून १४ करणार; अजित पवार करणार अमित शहांशी चर्चा

Oct 03, 2024 01:19 PM IST

Ajit Pawar : पुण्यात अजित पवार यांनी आज पत्रकारांची बोलतांना महत्वाचं वक्तव्य केलं. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आता अल्पवयीन आरोपींच वय १८ वरून १४ वर आणण्याचा विचार सुरू असल्याचं पवार म्हणाले.

अल्पवयीन आरोपींचं वय आता १८ वरून १४ करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार; अमित शहांशी करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय आता १८ वरून १४ करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार; अमित शहांशी करणार चर्चा

Ajit Pawar on Pune Crime : अजित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारी बाबत आज आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे. कारण पूर्वीची मुलांची बुद्धीमत्ता आणि आजची परिस्थिती वेगळी बनली आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा १४ वर्षाच्या खालील गृहीत धरला जावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही सरकारच्या वतीने करणार असल्याचं पवार म्हणाले.

अजित पवार यांनी बारामती येथे आज वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात आहे. या मुलांमध्ये रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती देखील वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढत आहेत. दरम्यान, ही मुळे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हेगाराप्रमाणे कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असावे. चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवक हा सराईत अथवा थेट गुन्हेगार गणला जावा अशी सर्वांची भूमिका आहे. अधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे. अल्पवयीन मुलांना आता कळून चुकलं आहे की १८ पर्यंत आपण गुन्हात अडकू शकत नाही. त्यामुळे देखील त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या बाबत मी अमित शहांशी बोललो. प्रत्यक्ष भेटल्यावर देखील मी या बाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील याबाबत सांगणार असून आम्ही या बाबत केंद्र सरकारला पत्र देऊन या बाबतचा प्रस्थाव देणार आहे, असे पवार म्हणाले.

देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं

अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी काल मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. एक नंबरची मुलगी चांगल्या नोकरीवाल्यांना मिळते, दोन नंबरची मुलगी पान टपरी आणि किराणा माल दुकानदारांना मिळते तर तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते" असे भुयार म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. यावर अजित पावर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणले, देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं असून त्याला मी दिलगिरी व्यक्त कर असे सांगितले आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं, ते अत्यंत चुकीचं होतं. या बाबत मी त्याला काल रात्री फोन करून समज दिली असल्याचं अजित पावर म्हणाले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर