अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी केला खोटा विवाह, आता कोर्टाने दिला दणका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी केला खोटा विवाह, आता कोर्टाने दिला दणका

अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी केला खोटा विवाह, आता कोर्टाने दिला दणका

Nov 16, 2024 12:02 AM IST

पत्नीचे वय १८ वर्षांखालील असल्यास संमतीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीचे वय १८ वर्षांखालील असल्यास संमतीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. आरोपीने युक्तिवाद केला की, पीडितेशी लैंगिक संबंध सहमतीने होते आणि त्यावेळी ती त्याची पत्नी होती. अशा परिस्थितीत याला बलात्कार म्हणता येणार नाही. गोविंद सानप यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

१२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात न्यायाधीशांनी म्हटले आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्यानुसार अपीलकर्त्याने पीडित पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार किंवा लैंगिक हिंसा मानले जाणार नाही हे मान्य केले जाऊ शकत नाही. १८ वर्षांखालील मुलीशी संभोग करणे, मग ते विवाहित असो वा नसो, बलात्कार आहे, हे सांगणे महत्त्वाचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता या खटल्यात पत्नीशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दोघांमध्ये कथित विवाह झाला असे गृहीत धरले तरी पीडितेने तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याचा केलेला आरोप लक्षात घेता तो बलात्कार ठरेल.

काय होते प्रकरण -

९ सप्टेंबर २०२१ रोजी वर्धा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने या तरुणाला पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. आता या आदेशाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर याचिकाकर्त्याला २५ मे २०१९ रोजी अटक करण्यात आली. त्यावेळी मुलगी ३१ आठवड्यांची गरोदर होती. या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि अपीलकर्त्याने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ते सुरू ठेवले, असा युक्तिवाद पीडितेने केला.

गरोदर राहिल्यानंतर पीडितेने अर्जदाराला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने घर भाड्याने घेऊन शेजाऱ्यांच्या उपस्थितीत तिला वरमाला घालून सांगितले की, तू माझी पत्नी आहेस त्यानंतर त्याने तक्रारदाराला गर्भपातासाठी आग्रह धरला. मात्र, पीडितेने याला नकार देत पतीविरोधात मारहाणीचा आरोप केला होता. आरोपीने पीडितेला तिच्या आई-वडिलांच्या घरी मारहाण केली तेव्हा तिच्या लक्षात आले की, याचिकाकर्त्याने लग्नाचे नाटक करून तिचे शोषण केले आहे.

कनिष्ठ न्यायालयात झालेल्या उलटतपासणीत पीडितेने बालकल्याण समितीकडे तक्रार केल्याची कबुली दिली आहे. तसेच छायाचित्रांचा हवाला देत तो तिचा पती असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आता याआधारे अपीलकर्त्याने हे लैंगिक संबंध सहमतीने असल्याचे म्हटले होते. "माझ्या मते हा युक्तिवाद मान्य न करण्याची एकापेक्षा जास्त कारणे आहेत. गुन्ह्याच्या वेळी पीडितेचे  वय १८ वर्षांपेक्षा कमी होते, हे सरकारी पक्षाने सिद्ध केले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर