Mumbai Crime : एका खासदाराचा स्वीय सहाय्यक असल्याचा बनाव करत एका भामट्याने मुंबईतील प्रसिद्ध सोबो रेस्टॉरंट बडेमियाचे मालक जमाल शेख यांची फसणवुक केली आहे. शेख याच्या मुलीला शासकीय विधी महाविद्यालयात (जीएलसी) प्रवेश देण्याच्या बहाण्याने ९.२७ लाख लुबडले तर पक्षाच्या २०० कार्यकर्त्यांना जेवण द्यायचे आहे असे म्हणत आरोपीने २ लाख रुपयांच्या जेवणाची ऑर्डर देऊन पैसे न देता अनेकांनी या हॉटेलच्या जेवणावर ताव मारला. शेख यांना तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.
सूरज काळव, असे आरोपीचे नाव आहे. काळाचौकी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सूरज काळव याला अटक केली आहे. त्याच्यावर फसवणुकीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तोतयागिरी करणे, फसवणूक करणे यांचा समावेश करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.
या प्रकरणी हॉटेल मालक जमाल शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ जुलै रोजी सूरज काळव याने शेख यांना फोन केला. त्याने तो एका खासदाराचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगितलं. तसेच लोकसभा निवडणूक जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी २०० कार्यकर्त्यांना जेवणाची ऑर्डर त्याने दिली. त्याने पक्ष कार्यकर्त्यांसाठी २०० गुलाब जामुन आणि शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणीची ऑर्डर दिली. शिवाय, करी रोड येथील एका व्यक्तीला ४० लोकांचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देण्यासंगितले. शेख यांनी त्यानुसार सर्वांना जेवण पोहोचवले. या जेवणाचे बिल २ लाख रुपये झाले होते. मात्र, त्याने ते पैसे न देता पोबारा केल्याचे पोलिसांनी संगितले.
सूरजने यापूर्वीही या रेस्टॉरंटला ऑर्डर दिली होती, पण त्यावेळी त्याने पैसे दिले होते, असे पोलिसांनी सांगितले. खासदाराचा पीए असल्याचे खोटे सांगणाऱ्या सूरजने शेखच्या मुलीला जीएलसी महाविद्यालयात प्रवेश देण्याचे देखील आश्वासन दिले आणि त्याबदल्यात त्यांच्या कडून ९.२७ लाख रुपये घेतले.
वांद्रे येथील एका खासगी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शेख यांच्या मुलीला तिच्या घरापासून जवळच असलेल्या चर्चगेट येथील जीएलसीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. सुरजने शेख यांना या विद्यालयात त्यांच्या मुलीला प्रवेश देण्याचे आश्वासन दिले.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सूरजने शेखला फोन केला आणि त्याला प्रवेशासाठी देणगी द्यावी लागेल असे कळवले, यांना शेख यांनी सहमती दिली. सुरुवातीला, कॉलेजची फी भरण्याच्या बहाण्याने त्याने ४९ हजार रुपये घेतले. नंतर त्याने ३ लाख रुपये डोनेशन, अतिरिक्त फी, रजिस्ट्रेशन इत्यादीसाठी आणि ट्रस्टींसाठी ५ लाख रुपये घेतले. शेख यांच्या कडून त्याने एकूण ९,२७ रुपये घेतले. लाख आणि फसवणूक केली. काळोख याने शेख यांची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, "गुन्हे शाखेने त्याला अटक केली. आरोपीला आज बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.