मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Deora: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Milind Deora: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2024 04:29 PM IST

Milind Deora Quits Congress: काँग्रेसचे जेष्ठ नेते मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली.

Milind Deora
Milind Deora

Milind Deora Set To Join Shiv Sena: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

अरविंद सावंत या जागेवरून दोनदा निवडून आले होते. म्हणूनच उद्धव ठाकरे हे त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला उमेदवारी देण्यास तयार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत प्रतिष्ठेची जागा इतर कोणत्याही पक्षाला दिली जाणार नाही, असे सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले.

काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र मिलिंद देवरा हे शिंदे गटात दाखल होत असले तरी त्यांना त्यांच्या नव्या पक्षाकडून तिकीट मिळेल याची शाश्वती नाही. कारण भाजपने या जागेवर आपला दावा केला.यामुळे शिंदे यांनी देवरा यांना राज्यसभेची जागा देऊ केल्याचे समजते आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वेळी या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने महायुतीमध्ये ही जागा मिळावी, अशी शिंदे गटाची इच्छा आहे.

मिलिंद देवरा सलग दोन वेळा (२००४, २००९) या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचं वजन आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या शिंदे गट प्रवेशावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

WhatsApp channel