Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या टीझरच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसच्या या टीझरने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला टीझर जारी केला आहे. काँग्रेसने जारी केलेल्या टीझरमध्ये दिसत आहे की, बेरोजगारीला कंटाळून इंजिनिअर झालेल्या तरुणाने रस्त्यावर वडापावचा स्टॉल लावला आहे. तितक्यात एक गाडी त्याच्या स्टॉलजवळ येते. या गाडीतून तीन जण खाली उतरतात. यातील एक व्यक्ती संबंधित तरुणाच्या पदार्थांच्या चवीची प्रशांसा करतो आणि भविष्यात त्याच्यासारख्या लोकांना वडापाव विकायचा आहे, असे सांगतो. मात्र, त्यानंतर वडापाव विकणारा तरूण महाराष्ट्रातून आठ मोठे प्रकल्प आणि नोकऱ्या गुजरातला पळवल्याने राज्यातील तरुणांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे, अशा शब्दांत त्यांना प्रत्युत्तर देतो.
पुढे तरुण म्हणतो की, 'महाराष्ट्रातील बेरोजगारील कोण जबाबदार कोण आहे? राज्यातील तरुणाईचा असा अपमान आता चालणार नाही. आता काँग्रेसचा हातच आम्हाला साथ देईल', असा विश्वास तो व्यक्त करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने रविवारी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसने एकूण १४ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या. काँग्रेसने आपल्या चौथ्या यादीत अनेक मोठ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
१) अमळनेरमध्ये अनिल शिंदे
२) पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे
३) शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
४) दक्षिण- दिलीप माने
५) उमरेड – संजय मेश्राम
६) अरमोरी- रामदास मसराम
७) चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
८) बल्लारपूर – संतोषसिंग रावत
९) वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
१०) नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार
११) औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
१२) नालासोपारा – संदीप पांडे
१३) अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
१४)पंढरपूर – भगिरथ भालके
संबंधित बातम्या