मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Dhangekar : महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे भोवले! आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा

Ravindra Dhangekar : महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे भोवले! आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा

Jan 30, 2024 06:44 PM IST

Congress MLA Ravindra Dhangekar : पुण्यातील एका कार्यक्रमात महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे कसबा विधानसभा मतदार संघांचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar

Congress MLA Ravindra Dhangekar : भाजपला शह देऊन कसबा विधासभा मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात महापलिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे त्यांना भोवले आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तयांच्यावर टीका देखील केली होती.

Agniveer : सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही अग्निवीरांना नोकरीची चिंता नाही! सरकार कौशल्यवीर योजना सुरू करण्याच्या तयारीत

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेसला डावलल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे महापालिकेच्या अभियंता संघाने याचा निषेध केला तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमदार धंगेकर व इतर कार्यकर्त्यांवर चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

Maharashtra Weather update : फेब्रुवारीतही हुडहुडी! थंडी वाढणार; हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, वाचा

आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी करण्यात येणार होते. मात्र, या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला. दरम्यान, या शासकीय कार्यक्रमाच्या आधीच या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते तेथे गेले होते. त्यांनी टाकीपाशी जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी आमदार धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. हा व्हिडिओ ट्विट करत भाजपचे माजी आमदार मुरलीधर मोहोळ यांनी टीका देखील केली होती. महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध करत त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर