मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parniti Shinde : अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली ? प्रणिती शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Parniti Shinde : अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली ? प्रणिती शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Feb 12, 2024 06:36 PM IST

Praniti Shinde on Ashok Chavan : वारंवार छापेमारी करून,प्रेशर टाकून अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल करण्यात आले म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Praniti Shinde on Ashok Chavan
Praniti Shinde on Ashok Chavan

काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे प्रणिती म्हणाल्या. वारंवार छापेमारी करून, प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी ही दुर्दैव गोष्ट आहे. चव्हाण भारदस्त नेता होते. भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर टाकून ब्लॅकमेल करायचं आणि अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणायचं, असा आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर केला आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत अनेक काँग्रेस आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यात पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा वआमदार प्रणिती शिंदे यांचेही नाव चर्चेत येते. याबद्दल विचारले असता त्यांना याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जातात. हा भाजपच्या मनाचा खेळ आहे,असेप्रणिती म्हणाल्या.

प्रणिती म्हणाल्या आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. मी आणि साहेबांनी (सुशीलकुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधून यावर भाष्य केलं. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांच्यासारखे बड्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. भाजपचे हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वारंवार केवळ विरोधी नेत्यांवर दबाव आणला जातो. त्यांचा हेतूपूर्वत मानसिक त्रास दिला जातो. एका प्रकारे ब्लॅकमेल करण्यात येते. त्यातून विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावून स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.  म्हणूनच अशोक चव्हाण यांनी केवळ त्रास वाचविण्यासाठी हतबल होऊन काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

काँग्रेसी म्हणूनच मरेन - प्रणिती

भाजपकडून विरोधी पक्ष संपविण्याचा आणि देशात स्वतःचा एकच पक्ष राखण्याचा घृणास्पद प्रयत्न होतआहे. अन्यकाही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा सोडल्या जातात,हे काही नवीन नाही. परंतु आपण काँग्रेस सोडून भाजप किंवा अन्य कोणत्याही सोयीच्या पक्षात जाण्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवू शकत नाही. आपल्यावर ईडी वा अन्य यंत्रणांचा दबाव येऊ शकत नाही. कारण आपण वा आपले कुटुंबीय कोणत्याही संस्थांशी वा आर्थिक व्यवहाराशी संबंधित नाहीत.

 

आपले राजकारण ज्या मूलभूत मूल्यांवर आधारले आहे, ती मूलभूत तत्त्वे केवळ काँग्रेस पक्षाची आहेत. ती भाजपकडे अजिबात नाही. आपण काँग्रेसी जन्मले , काँग्रेसी म्हणून घडले आणि काँग्रेसी म्हणून मरेन, अशा निष्ठांचा त्यांनी पुनरूच्चार केला.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर