Narendra Modi: गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसनं गरिबांना लुटलं, मोदींचा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narendra Modi: गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसनं गरिबांना लुटलं, मोदींचा आरोप

Narendra Modi: गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसनं गरिबांना लुटलं, मोदींचा आरोप

Nov 15, 2024 07:14 AM IST

PM Modi On Congress: गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेस गरिबांची लूट करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसनं गरिबांना लुटलं- नरेंद्र मोदी
गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसनं गरिबांना लुटलं- नरेंद्र मोदी

Maharashtra Assembly Election 2024 गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेस गरिबांची लूट करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.काँग्रेसने नेहमीच गरीबीच्या अजेंड्यावर काम केले. पिढ्यानपिढ्या त्यांनी 'गरीब हटाओ'चा खोटा नारा दिला आहे. गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसने गरिबांची लूट केली, असे मोदी पनवेल मध्ये झालेल्या जाहीर सभेत म्हणाले.

बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आपले अस्तित्व जपण्यासाठी आणि सत्तेत येण्यासाठी काँग्रेस काहीही करेल. घुसखोर, रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना स्वस्त दरात गॅस सिलिंडर देणार असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने उघडपणे जाहीर केले. मतांसाठी ते तुमच्या मुलांच्या भवितव्याशी कसे खेळत आहेत? याचे हे उदाहरण आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

राष्ट्रसेवेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेतला

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 'रायगडाशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे, भावनिक नाते आहे. २०१३ मध्ये जेव्हा मला भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले, तेव्हा मी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. ज्याप्रमाणे देवासमोर बसून सुख, समृद्धीसाठी आशिर्वाद घेतला जातो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून मी राष्ट्रसेवेसाठी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.'

महाराष्ट्राला विकासाची शिखरे गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

‘विकसित भारताच्या विक्रीसाठी सुरजसोबत स्वराज्य आवश्यक आहे. जेव्हा आपले गरीब पुढे जातील तेव्हा, हा संकल्प पूर्ण होईल. भाजप आणि महायुतीयुतीच हा संकल्प पूर्ण करू शकते. रायगडच्या जनतेचा आम्हाला आशीर्वाद मिळत आहे. महाराष्ट्राला विकासाची शिखरे गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही’, असेही मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान, निकाल कधी?

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकून दमदार कामगिरी केली होती, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर