मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य, विजय वडेट्टीवारांची माहिती

धक्कादायक.. महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य, विजय वडेट्टीवारांची माहिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 21, 2023 02:21 PM IST

Farmers committed suicide : राज्यात गेल्या सात महिन्यात तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

महाराष्ट्रात १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलैपर्यंत २०२३ या सात महिन्यात तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. अमरावतील विभागात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. अमरावती विभागात गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय विडेट्टीवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यंदा राज्यात पुरेसा पाऊस न पडल्यानं अनेक भागातील पिके करपू लागली आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातले शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान,राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 

शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी

अमरावती विभागात ६३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती १८३
बुलढाणा १७३
यवतमाळ १४९
अकोला ९४
वाशीम ३८

औरंगाबाद विभागात ५८४ शेतकरी आत्महत्या

बीड १५५
उस्मानाबाद (धाराशिव) १०२
नांदेड ९९
औरंगाबाद ८६
परभणी ५१
जालना ३६
लातूर ३५
हिंगोली २०

नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या

जळगाव ९३
अहमदनगर ४३
धुळे २८
नाशिक ०७
नंदुरबार ०३

नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या

चंद्रपूर ७३
वर्धा ५०
नागपूर १३
भंडारा ०५
गोंदिया ०३

पुणे विभागात १६ शेतकरी आत्महत्या

सोलापूर १३
सातारा ०२
सांगली ०१
(पुणे आणि कोल्हापूरशून्य शेतकरी आत्महत्या)

कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही

जून महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

जानेवारी २२६
फेब्रुवारी १९२
मार्च २२६
एप्रिल २२५
मे २२४
जून २३३
जुलै २२९

WhatsApp channel