विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! काँग्रेस नेत्याची खोचक टीका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! काँग्रेस नेत्याची खोचक टीका

विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! काँग्रेस नेत्याची खोचक टीका

Updated Jul 05, 2024 09:00 PM IST

Vijay wadettivar : विधीमंडळाच्या परिसरामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावलेल्या पोस्टरवरून राजकारण रंगले आहे. पोस्टरवर भारतीय खेळाडूंचे फोटो न लावल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे.

विधीमंडळ परिसरात लावलेेले पोस्टर
विधीमंडळ परिसरात लावलेेले पोस्टर

Vijay wadettivar criticism on Government : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाच्या वर्षाव होत आहे.विश्वविजेता भारतीय संघगुरुवारी मायदेशी परतल्यानंतर मुंबईत विजयी परेड करण्यात आली. यावेळी लाखो मुंबईकर आपल्या लाडक्या खेळाडूंच्या स्वागताला रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर आजटी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कारकरण्यात आला. मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

विधीमंडळाच्या परिसरामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हे बॅनर लावले आहेत. या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावले आहेत. मात्र एकाही भारतीय खेळाडूचा फोटो वापरण्यात आलेला नाही. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

काँग्रेस नेतेव विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर खोचक टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, "या तिघांचं काय योगदान? विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनातआज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये एक तरी खेळाडू दिसतोय का? घेणं न देणं फक्त क्रेडिट घेण्याची घाई!"

दुसरीकडे, यावरून आमदार रोहित पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी या फलकाचा फोटो दाखवत सत्ताधारी यांना फलकबाजी करण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. भारतीय संघ हा सर्वांचा आहे, देशाचा आहे. त्यामुळे स्वतःचे फलक लावण्यात सत्ताधाऱ्यांनी समाधान मानले. भारतीय संघाचे फोटो वापरून खाली सत्ताधारी आणि विरोधकांचे नाव वापरले असते, तर अधिक चांगला संदेश गेला असता. परंतु सत्ताधाऱ्यांना फलकबाजी करण्यातच आनंद वाटतो, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर दुसरे पोस्टर लावण्यात आले. त्यावर भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो झळकले. त्यानंतर पुन्हा ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले कीमोठ्या मेहनतीने विश्वचषकावर भारताचं नाव कोरल्याबद्दल #TEAMINDIA चा फोटो लावून अभिनंदन करण्याऐवजी सत्ताधारी आमदाराने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावून अभिनंदन केलं.. त्यांची ही राजकीय चमकोगिरी उघड केल्यानंतर का होईना टीम इंडियाचा फोटो लावण्याची उपरती त्यांना झाली,पण लोकशाहीचं राज्यातील सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानभवनाजवळ अशा प्रकारचे फ्लेक्स लावताना आणि तेही खेळासंदर्भात तरी सत्ताधाऱ्यांनी असं राजकारण न करण्याची दक्षता घ्यायला पाहिजे.

दरम्यान आत विश्वविजेत्या संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंचा विधानभवनात सत्कार पार पडला. विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव,शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर