मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajni satav : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajni satav : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 18, 2024 11:03 PM IST

Rajni Satav Passed Away : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या व माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. नांदेडमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Rajni Satav
Rajni Satav

Rajni Satav death : माजी मंत्री व काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली, रजनी सातव यांच्या निधनामुळे हिंगोलीमध्ये शोककळा पसरली आहे. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या.

रजनी सातव या काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या आई आहेत. तर विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याील आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषवलं होतं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रजनी सातव यांनी एकदा विधानसभेत तर एकदा विधानपरिषद निवडून गेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी राज्यमंत्रीपदही सांभाळलं आहे. काँग्रेसच्या प्रदेश संघटनेतही त्या अनेक वर्ष सक्रिय होत्या. सातव कुटुंबीय गेल्या ४३ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून गांधी घरण्याचे निकटवर्तीय, अशी सातव कुटुंबियांची ओळख आहे. 

रजनी सातव यांचा जन्म १३ जुलै १९४९ रोजी पुण्यात झाला होता. रजनी सातव यांनी बीएससी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी कायद्याचीही पदवी घेतली होती.  १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली व जिंकली होती. 

त्यानंतर शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात रजनी सातव यांना १९८६ मध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तसेच १९८८ मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, समाज कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. १९९३ ते १९९९ या काळात त्यांनी दोन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणूनही काम केलं.

IPL_Entry_Point

विभाग