Priya Datta on the way to Shivsena Eknath Shinde : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. यात कॉँग्रेसमधून अनेक बडे नेते हात सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशोक चव्हाण, मुरली देवरा यांच्या नंतर आता माजी खासदार प्रिया दत्त या देखील काँग्रेसचा 'हात' सोडण्याच्या मार्गावर आहेत. प्रिया दत्त या एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. अनेक पक्ष निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजप ४०० पारच्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विरोधकांना पक्षात प्रवेश देत आहेत. राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होण्याची चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसचे जुने आणि बडे नेते पक्षाची साथ सोडत आहे. माजी खासदार प्रिय दत्त या आता पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत.
प्रिया दत्त या काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी असून सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रिया दत्त यांना लोकसभा निवडणुकीचे तिकिट देऊन खासदार केले होते. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, काँग्रेसत्यांना आता पुन्हा संधी देण्याच्या मनस्थितीत नाही. यामुळे पक्षातून काही मिळणार नसल्याने प्रिया दत्त या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास महायुतीची ताकद वाढणार आहे.
मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून प्रिया दत्त या २००९ मध्ये निवडणून आल्या होत्या. यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पूनम महाजन यांनी त्यांचा सलग २ वेळा पराभव केला. प्रिया दत्त या पक्षात सक्रिय नाहीत. त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाज सेवेत सक्रिय आहेत. मात्र, आता त्या कॉंग्रेसला राम राम करणार असल्याची चर्चा आहे. या बाबत त्यांनी कोणतेही विधान केले नसले तरी या बाबत त्या लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.