छातीत दुखू लागल्यानं प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छातीत दुखू लागल्यानं प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार!

छातीत दुखू लागल्यानं प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार!

Oct 31, 2024 02:06 PM IST

Prakash Ambedkar Hospitalised : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली.

छातीत दुखू लागल्यानं प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार!
छातीत दुखू लागल्यानं प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार! (HT_PRINT)

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज (३१ ऑक्टोबर २०२४) पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांचे समर्थक करत आहेत. 

वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटर हँडवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. आंबेडकर कुटुंबाने विनंती केली आहे की, कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा.'

पुढे असेही सांगण्यात आले आहे की, ‘प्रकाश आंबेडकर हे पुढील ३ ते ५ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.’

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधानसभेतही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीशी झालेली चर्चा अयशस्वी ठरल्याने त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावल्याने पक्षाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कामात अडथळा येऊ शकतो, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आंबेडकर लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

वंचितकडून प्रथमच तृतीयपंथीयाला तिकीट

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच वंचित आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ११ उमेदवारांना संधी देण्यात आली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय आहे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर १० मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. वंचितने विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली असून आतापर्यंत पाच उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत.

 

 

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर