Maharashtra Vidhan Parishad Election Result: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांमध्ये ९ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तर, महाविकास आघाडीच्या खात्यात दोन जागा जमा झाल्या आहेत. मात्र,महाविकास आघाडीकडे मतांचा कोटा पूर्ण असताना शरद पवार यांनी पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "जे कुणी बदमाश आहेत, ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढले जाईल", असेही नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
विधान परिषदेचा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा ठरला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची माहिती समोर आली. यावर नाना पटोले म्हणाले की, "आम्ही ट्रॅप लावला होता, ज्यात बदमांश लोक सापडली आहेत. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली. ज्यांनी पक्षाविरोधी काम केले, पक्षासोबत गद्दारी केले, त्यांना पक्ष बाहेरचा रस्ता दाखवेल. काँग्रेस हा लोकशाहीला मानणार पक्ष आहे. देशाचा काँग्रेसवर विश्वास आहे. त्याच विश्वासावर आम्ही आमदार, खासदार निवडून आणतो. यामुळे गद्दारांनाा अशी अद्दल घडवली जाईल की, पुन्हा कुणी तसे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. लवकरच त्यांची नावे समोर येतील.”
१. भाजप - पंकजा मुंडे
2. भाजप - योगेश टिळेकर
३. भाजप - परिणय फुके
४. भाजप - अमित गोरखे
5. भाजप - सदाभाऊ खो
६. शिवसेना - कृपाल तुमाने
७. शिवसेना - भावना गवळी
८. राष्ट्रवादी - राजेश विटेकर आणि
९. राष्ट्रवादी - शिवाजीराव गर्जे
१०. शिवसेना (यूबीटी)- मिलिंद नार्वेकर
११. काँग्रेस - प्रज्ञा सातव
महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही आमदार त्यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग करतील, अशी आशा होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दमदार कामगिरीनंतर पुनरागमनाचा विचार करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटातील अनेक आमदार विरोधकांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीने नुकताच केला आहे.