कसेबसे जिंकलेले नाना पटोले पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेणार, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कसेबसे जिंकलेले नाना पटोले पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेणार, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार

कसेबसे जिंकलेले नाना पटोले पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेणार, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार

Nov 25, 2024 12:50 PM IST

Nana Patole to resign : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राज्यातील पक्षाच्या खराब कामगिरीमुले पक्षात नैराश्य पसरलं आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने नाना पटोले मोठा निर्णय घेणार! काँग्रेसला धक्का
विधानसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने नाना पटोले मोठा निर्णय घेणार! काँग्रेसला धक्का (PTI)

congress leader nana patole may give resignation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या खराब निकालांमुळं पक्षात नैराश्याचे वातावरण असून पराभवाची जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिला नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील, असे देखील पक्षाचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमधील कलह आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल गांधी, खर्गे यांच्यासह अनेक नेते पक्षाच्या या पराभवाचा सविस्तर आढावा घेणार आहेत.

राज्यात कॉँग्रेसला केवळ १६ जागा

खुद्द नाना पटोले हे जेमतेम २०८ मतांनी त्यांच्या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या दोन ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला. नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. या निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस कायम होती. या चुरशीच्या सामन्यात नाना पटोले कसेबसे जिंकले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ १६ जागा मिळू शकल्या. काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होता. पण गेल्या अनेक दशकांपासून पक्षाची कामगिरी घसरत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. महाविकासआघाडीचा दारुण परभव झाला आहे. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले. १६ उमेदवार निवडून आल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढावली आहे. पटोले हे दिल्लीला गेले असतांना रविवारी २४ नोव्हेंबरला त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेत राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने अद्याप स्वीकारलेला नाही.

पराभवावर आम्ही मंथन करू, असे काँग्रेस नेत्यांच म्हणणे आहे. दरम्यान, पटोले यांनी राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत कलह ही सुरूच असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांचं म्हणणं आहे. निवडणुकीत पराभूत झालेले पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी म्हटले होते की, लाडकी बहीण योजना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नेत्यांच्या मेहनतीचा फायदा भाजप आणि मित्रपक्षांना झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वावर निशाणा साधत ते म्हणाले की, आमचे नेतृत्व कमकुवत आहे. नाना पटोले म्हणाले की, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळाला असला तरी आम्ही मेहनत घेऊ. जनतेचा विचार करावा याची आठवण आम्ही त्यांना करून देत राहू.

महायुतीला न भूतो न भविष्यती यश

महायुतीने २३३ जागांवर विजय मिळवला. यात भाजपला १३२ जागा, तर शिवसेना शिंदे गटाला ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १० जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना १२ जागा मिळाल्या आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर