मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Deora: शिंदे गटात प्रवेश करताच मिलिंद देवरांचे कार्यकर्त्यांना पत्र, म्हणाले...

Milind Deora: शिंदे गटात प्रवेश करताच मिलिंद देवरांचे कार्यकर्त्यांना पत्र, म्हणाले...

Jan 14, 2024 08:32 PM IST

Milind Deora Joins Shiv Sena: काँग्रेसचे जेष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Milind Deora and Eknath Shinde
Milind Deora and Eknath Shinde

Milind Deora Quits Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आजअखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावरून मिलिंद देवरा यांनी त्यांच्या समर्थक आणि मतदारांसाठी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला, हे जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणूनच मी माझी भूमिका आपल्या समोर मांडत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वर्षे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर मी काही धाडसी सुधारणांची तसेच त्यांच्या परिणामांना उत्तरदायी राहण्याची सूचना केली. २०१९ मध्ये मतदानाच्या फक्त १ महिना आधी नेमणूक झाली. मी निवडणुकीतील पराभवाचे संपूर्ण दायित्व स्वीकारले आणि माझ्या पदाचा राजीनामा दिला. मला असे वाटते की मी जेव्हा दायित्व स्वीकारले होते, तेव्हाच पक्षात घडलेल्या घटनांबाबत जाब विचारण्याचा अधिकारही माझ्याकडे आपोआपच आला”, असे मिलिंद देवरा म्हणाले.

पुढे मिलिंद देवरा म्हणाले की, “२०१९ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच्या युतीला विरोध केला. कारण त्याचा काँग्रेसवर घातक परिणाम होण्याची शक्यता होती. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारेपेक्षा वैयक्तिक फायद्याला प्राधान्य दिले जात होते आणि मी गेली चार वर्षे कुठले ही पाऊल उचलण्यापूर्वी सातत्याने सावधगिरी बाळगली.”

“मला सातत्याने बाजूला सारले गेले असले तरी गांधी घराण्याशी आणि काँग्रेसपक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले नाते कायम राखण्यासाठी माझी पक्षाशी बांधिलकी कायम राहिली. एक दशक मी वैयक्तिक पद किंवा सत्ता न मागता पक्षासाठी विविध भूमिकांमध्ये अथक परिश्रम केले. खेदाची बाब म्हणजे माझे वडील मुरलीभाई आणि मी अनुक्रमे १९६८ आणि २००४ मध्ये ज्या पक्षात प्रवेश केला होता, त्या काँग्रेस पक्षाची आणि आजच्या काँग्रेसची सद्यस्थिती वेगळी आहे”, असा खेदही मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

sambhaji raje news : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज काँग्रेसच्या वाटेने! लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेणार?

“प्रामाणिकपणा आणि विधायक टीकेबद्दल आदर बाळगण्याचा अभाव असल्यामुळे वैचारिक आणि संघटनात्मक मुळापासून ते विचलित झाले आहेत. एकेकेळी भारताच्या आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करणारा हा पक्ष आता औद्योगिक घराण्यांना ‘देशद्रोही’ ठरवतो आहे. भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि धर्म साजरे करण्याऐवजी जातीच्या आधारे फूट पाडणे आणि उत्तर-दक्षिण अशी दरी निर्माण करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. केवळ सत्ता मिळवण्यातच नव्हे, तर केंद्रात विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करण्यातही त्यांना अपयश आले आहे”, अशीही टीका मिलिंद देवरा यांनी केली.

मिलिंद देवरा सलग दोन वेळा (२००४, २००९) या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचं वजन आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या शिंदे गट प्रवेशावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग