Baba Siddique Join NCP : मुंबईतील काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी सिद्दीकी यांनी काँग्रेसवर टीका केली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याकाँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार? याबद्दल चर्चा सुरु होत्या. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आज बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रावादीत प्रवेश करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवत काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितलं.
बाबा सिद्धिकी म्हणाले की, पक्ष सोडू नये असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं. पण आपलं जमत नाही तिथे कशाला थांबायचं. मतभेद झाले तिथंच ठरवलं होतं की पक्षातून निघायचं. पक्ष सोडून जाताना दुःख होतं, पण पर्याय नसल्याची खंत आज बाबा सिद्धिकी यांनी बोलून दाखवलं.
बाबा सिद्दिकी यांनीदोन दिवसापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी म्हणजे आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे आज त्यांनीअजित पवारव अन्य नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
राजकारणात सुनील दत्त यांनीपुढंआणल्याची आठवण बाबा सिद्दीकी यांनी याप्रसंगी काढली. काँग्रेस पक्षात माझे मतभेद झाले. काँग्रेसमध्ये माझं मन दुखावलं गेलं. जेथे मन लागत नाही, तेथे थांबायचं नाही, असं ठरवलं होतं. कढीपत्त्याप्रमाणे आमचा उपयोग झाल्याची खंतही बाब सिद्दिकी यांनी बोलून दाखवली.
संबंधित बातम्या