मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!-congress leader baba siddique and his son zeeshan siddique will join ncp ajit pawar group ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

Feb 02, 2024 12:11 AM IST

Baba Siddique and Zeeshan Siddique : बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार गटात जाणार आहेत, यामुळे मुरली देवरा यांच्यानंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसत आहे..

Baba Siddique and Zeeshan Siddique
Baba Siddique and Zeeshan Siddique

मुंबईतील वांद्रे पूर्वचे माजी आमदार व काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी (Baba Siddique) काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्धीकी अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ बाबा सिद्धीकी यांच्या रुपात मुंबईत काँग्रेसला मोठा दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. बाबा सिद्दीकी मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार गटात जात आहेत. या प्रवेशामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

कोण आहे बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी?

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते.

Whats_app_banner