मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Congress : “..यामुळे राज्यातील ‘ईडी’ सरकार बरखास्त करा”; काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Congress : “..यामुळे राज्यातील ‘ईडी’ सरकार बरखास्त करा”; काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 31, 2022 11:50 PM IST

राज्यातीलसर्व घटकांनादिलासा देण्यात शिंदे-फडणवीसांचे‘ईडी’ सरकार अपयशी ठरले असल्याचे ते बरखास्त करावे,अशी मागणीकाँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.

काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

मुंबई –राज्यातीलसर्व घटकांनादिलासा देण्यात शिंदे-फडणवीसांचे‘ ईडी’ सरकार अपयशी ठरले असल्याचे ते बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यांत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला,सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. असे काँग्रेसने म्हटले आहे.

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पीक पूर्णपणे वाया गेले असून शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत करून पिकवलेली पिके अतिवृष्टीने वाया गेली आहेत. अशा शेतकऱ्यांनाआर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण अद्याप सरकारने ओला दुष्काळही जाहीर केला नाही आणि शेतकऱ्यांना मदतही दिली नाही,अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

गेल्या तीन महिन्यात १.५४ लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन,३ हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क,आणि २२ हजार कोटींचा टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून राज्यातील बेरोजगारांना मिळणारे रोजगारही हिरावले गेले आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या