Sachin Sawant Congress Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. विविध पक्ष निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करत आहेत. काल, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहिर केली. तर काँग्रेसने सुद्धा उमेदवारांची तिसरी यादी जाहिर केली. या यादीत अंधेरीतून सचिन सांवत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, याच उमेदवारीवरून ते नाराज झाले आहे. त्यांना वांद्रे येथून निवडणूक लढवायची होती. मात्र, ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे ते नाराज झाले आहे. त्यांनी काल ट्विट करत अंधेरीतून लढण्यास नकार देत मतदार संघ बदलून देण्याची मागणी केली आहे.
जागा वतापावरून महावीकास आघाडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून दोन्ही पक्षात धुसफूस सुरू आहे. असे असतांनाही दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले व प्रसार मध्यमानांवर पक्षाची बाजू मजबूत पणे मांडणारे सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ते येथून लढण्यास इच्छुक नसून त्यांनी नाराजी व्यक्त करत मतदार संघ बदलून देण्याची मागणी केली आहे.
सचिन सांवत यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे सांवत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यांनी पुढं म्हटलं आहे की, हा निर्णय मी वरिष्ठ नेत्यांवर सोपवला आहे. याठिकाणी माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी इच्छा असून यात मी नाराज असल्याचा काही ही भाग नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून मी जेथून निवडणूक लढण्यासाठी तयारी केली होती, तेथून मला निवडणूक लढण्याची संधी मिळावी अशी विनंती त्यांनी पक्ष नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीबाबत पक्ष नेते काय निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.