मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मैदान भरेल -भाजप
राम कदम
राम कदम

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मैदान भरेल -भाजप

03 October 2022, 16:23 ISTShrikant Ashok Londhe

खरी शिवसेना कोणाची हा वाद रंगलेला असताना महाआघाडीतील घटक पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (Congress and NCP workers) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला समर्थन दिलं आहे. त्यावरुन भाजप नेते आमदार राम कदमांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 

मुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा विशेष महत्वाचा ठरणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा (Dasara Melava) होत आहे. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर फुटीर गटाने मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याचे जाहीर करून आपलाच मेळावा कसा भव्य होईल यासाठी कंबर कसली आहे. तर, पारंपरिक शिवाजी पार्क (thackerays Dasara Melava in Shivaji park) येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. खरी शिवसेना कोणाची हा वाद रंगलेला असताना महाआघाडीतील घटक पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने(Congressand NCP workers) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला समर्थन दिलं आहे. त्यावरुन भाजप नेते आमदारराम कदमांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेच्या मेळाव्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यानीच मैदान भरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान भरण्यासाठी पेंग्विन सेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं मदत मागितली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच शिवाजी पार्क भरणार आहे. पक्षातील आमदार, खासदार व पदाधिकारी शिवसेनेला सोडून गेले आहेत, बाळासाहेबांच्या विचारांना सोडूनउद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ करत आहेत. सोबत गेले. त्यामुळेच, आता उरले-सुरलेही आमदार खासदार सोडून जात आहेत, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ ठाकरेंना सोडवत नाही, असे कदम यांनी म्हटले.

राष्ट्रवादीच्या सन्माननीय नेत्यांचा जो मानस होता की, शिवसेनेच्या मी ठिकऱ्या ठिकऱ्या करीन, शिवसेनेला मी संपवेन, त्यांचं ते स्वप्न पूर्णत्त्वास जाताना महाराष्ट्रात दिसून येत आहे. आम्ही उद्धव ठाकरेंचीशिवसेना मानत नाही, एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे, त्यांचीच शिवसेना आम्ही मानतो, असेही राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.

दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे-ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले आहेत. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात मातोश्रीबाहेर लावलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीकडून बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनरवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सचिन अहिर, आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरेआणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या असं सांगत खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत. त्यावर, आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.