पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका

पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका

Dec 31, 2024 06:55 AM IST

Pune News : पुण्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका पबने पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम आणि ओआरएक्सचे पाकीट वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका
पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका (Pixabay)

Pune Pub News: पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पब, हॉटेल, बार सज्ज झाले आहे. दरम्यान, या सेलिब्रेशनच्या नावाखाली पुण्यातील एका पबने भलताच प्रकार सुरू केल्याचं उघड झालं आहे. एका पबमध्ये निमंत्रितांसाठी व पबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना कंडोम व ओआरएसचे पाकीट वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यातील पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमध्ये घडला आहे. पबच्या या कृत्याची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे.

तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे पाऊल उचलून हा प्रकल्प सुरू केल्याचे पबचे मालिक यांनी सांगितले आहे. तर आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने कंडोम व ओआरएसचे पाकीट वाटप करणार असल्याचा दावा पबने प्रशासमाणे केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीत येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंदवले आहे. या पब व्यवस्थापकडून पोलिसांनी देखील माहिती घेतली आहे. दरम्यान, कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला असून पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे या बाबत तक्रार करण्यात आली आहे.

काय आहे प्रकार ?

पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबने देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन केले असून या पार्टीत येणाऱ्यांना पबकडून कंडोम व ओआरएसचे पाकीट वाटप केले जाणार आहे. दरम्यान, हे कृत्य शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे," असे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकारामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश पोहोचण्याची भीती आहे. तसेच अनेक गैरसमज व चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असे देखील पुणे पोलिसांना करण्यात आलेल्या तक्रार पत्रात म्हटलं आहे.

पहाटे पाच पर्यंत रंगणार पार्ट्या

पुण्यातील हॉटेल आणि पब, बारला ३१ तारखेला व १ तारखेला पहाटे ५ पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रभर पार्ट्या रंगणार आहेत. पुणेकर यामुले नवींन वर्षांचे जल्लोषात स्वागत करून सरत्या वर्षाला निरोप देणार आहेत.

पुण्यात चोख बंदोबस्त

३१ तारखेला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुण्यात ३१ च्या रात्री पोलिस गस्त वाढवणार आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर