Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा; अटकेचीही टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा; अटकेचीही टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा; अटकेचीही टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?

Updated Jul 18, 2024 05:04 PM IST

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव टाकल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव टाकल्याचा आरोपही त्यांच्याव रकरण्यात आलाआहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या दोन वकिलासंहित २२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना अटकही केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. यामुळे आव्हाड यांच्यावरअटकेची टांगती तलवार आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला होता. मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. हा प्रकार अनावधानाने झाल्याचं आव्हाड यांनी सांगितल्यानंतरही भाजपने हा मुद्दा लावून धरला होता. याप्रकरणा दोन गुन्हे दाखल झाले असतानाच आता पुन्हा नव्या प्रकरणात आव्हांडावर गुन्हा दाखल झाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे. तसेच कलम ३५४ अंतर्गत दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादी महिलेवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पीडित महिलेवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला गेला आहे.

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या दोघा वकिलांसह २३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा येथे राहणाऱ्या इस्टेट एजंट शबाना सोंधी यांना अटक करण्यात आली आहे. तर आव्हाड यांच्यासह इतरांना तातडीने अटक करा, अशी मागणी पीडित महिलेने पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात आव्हाड यांनी संबंधित महिलेला दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हाही नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर आव्हाड यांनी जुन्या घटनेवरून एकाला हाताशी धरून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे.

मात्र कोणताही पुरावा उपलब्ध न झाल्याने हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. तसेच आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून कलम ३७०,३७० (अ),५०४,३४,सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन कलम ३,४,५,चे कलम ४,६,१०,१२,१७ प्रमाणे पीटा, पॉस्कोचा गुन्हा दाखल केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. तसेच हे आरोपही सिद्ध न झाल्याचे पीडित महिलेचं म्हणणं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर