Pune Viral Video : नशेतील मुलींच्या व्हायरल व्हिडीओमुळे 'पिट्याभाई' गोत्यात; महिला आयोगाकडे तक्रार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Viral Video : नशेतील मुलींच्या व्हायरल व्हिडीओमुळे 'पिट्याभाई' गोत्यात; महिला आयोगाकडे तक्रार

Pune Viral Video : नशेतील मुलींच्या व्हायरल व्हिडीओमुळे 'पिट्याभाई' गोत्यात; महिला आयोगाकडे तक्रार

Feb 27, 2024 07:08 AM IST

Pune drunken girls Viral Video : पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत काही नशेत असलेल्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अभेनेते रमेश परदेशी यांनी पुण्यातील नशेत वावहत जाणाऱ्या तरुणाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता याच व्हिडिओमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

drunken girls found on vetal hill
drunken girls found on vetal hill

Pune drunken girls Viral Video actor Ramesh Pardeshi : पुण्यात रविवारी वेताळ टेकडीवर काही तरुणी आणि तरुण अमली पदार्थांचे सेवन करून नशेत पडून होते. या तरुणींचा व्हिडिओ काढत मुळशी पॅटर्नमधील पिट्या भाईची भूमिका साकार करणारे अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यातील तरुणाई बद्दल चिंता व्यक्त करत पालकांना मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला होता. मात्र, आता याच व्हिडओमुळे रमेश परदेशी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबईतील एका महिला पत्रकाराने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

वेताळ टेकडीवर नशेत असणाऱ्या मुलींचा व्हिडिओ रमेश परदेशी यांनी काढत लाईव्ह केले होते. दरम्यान, यावेळी हा व्हिडिओ काढतांना मुलींचे चेहरे ब्लर त्यांनी केले नव्हते. त्यामुळे या व्हीडिओत मुलींचे चेहेरे स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ काढतांना परदेशी यांनी या मुलींनी ड्रग्स घेतले असल्याचा दावा केला होता. तसेच पुणे पोलिसांनी केलेल्या करवाईचा संदर्भही त्यांनी दिला होता. यावेळी त्यांनी पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याचे देखील सांगितले होते. मात्र मुंबईतील पत्रकार नेहा पुरव यांनी मुलींचे चेहरे ब्लर न करता थेट दाखवल्यामुळे मुलींची बदनामी झाल्याचे म्हणत महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांनी ड्रग्स घेतले असून बियर घेतल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Maharashtra weather update: विदर्भाला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

अभिनेते रमेश परदेशी यांनी वेताळ टेकडीवरील काढलेल्या व्हिडिओत एक तरुणी नशेत बडबड करत असल्याचे दिसत आहे. तर एक मुलगी बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे. या व्हीडिओत मुलींचे चहरे स्पष्ट दिसत आहेत. रमेश परदेशी यांनी या मुलींनी अंमली पदार्थ घेतल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत परदेशी म्हणाले की, वेताळ टेकडीवर आम्ही मॉर्निंग वॉकला आलो असतांना महाविद्यालयात शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेत टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. त्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी आणले असून त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार आहोत. तसेच पुण्याची तरुणाई वाममार्गाला लागली असून ही चिंतेची बाब असल्याचे परदेशी म्हणाले होते.

Mumbai Water Cut : उदंचन केंद्राला आग लागल्याने मुंबईत जलसंकट! 'या' भागांमध्ये मध्यरात्रीपासून १०० टक्के पाणीकपात

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मुंबईतील पत्रकार नेहा पुरव यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत थेट महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या व्हिडिओमुळे त्या मुलींची बदनामी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बाबत पोस्ट करत नेहा पुरव म्हणाल्या, पुण्यात दोन मुली नशेच्या अमलाखाली कथित संस्कृती रक्षकांना आढळून आल्या. सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चूकच आहे. त्या बद्दल त्यांना माफ करताच येणार नाही. पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढील करिअर, पुढील आयुष्य बघता हा व्हीडिओ व्हायरल करणे किती योग्य होते? त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का? असा सवाल त्यांनी केला. मी या प्रकारानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधुन पत्रकार म्हणून माहिती घेतली. तेव्हा या मुली बिअर प्यायला होत्या आणि पोटात अन्न नसल्याने त्यांना नशा आल्याचे पोलिसानी सांगितले. या मुलींनी ड्रग्ज घेतले नव्हते, अशी माहिती पुरव यांनी दिली. या प्रकारानंतर नेहा पुरव यांनी राज्य महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली. महिला आयोगाने ही तक्रार दाखल केली असल्याचे नेहा पुरव यांनी म्हटले.

दरम्यान, नेहा पुरव यांच्या या तक्रारीमुळे रमेश परदेशी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महिला आयोग पुरव यांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणार का या कडे आता लक्ष लागून आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर